Rajyamata-Gomata: शिंदे सरकारने दिला गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा, पाहा GR जसाच्या तसा...

ऋत्विक भालेकर

• 08:16 PM • 30 Sep 2024

Cow the status of state mother-cow: विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वाचा या निर्णयाचा GR.

शिंदे सरकारने गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा देण्याचा घेतला निर्णय

शिंदे सरकारने गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा देण्याचा घेतला निर्णय

follow google news

बातम्या हायलाइट

point

देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब

point

शिंदे सरकारने दिला गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा

point

विधानसभा निवडणुकीआधी घेतला मोठा निर्णय

Shinde Govt Rajyamata-Gomata: मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा दिल्याने मंत्री विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले. (before maharashtra vidhan sabha election shinde govt declares indigenous cows rajyamata gomata ahead)

हे वाचलं का?

देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.

हे ही वाचा>> Anand Dighe: 'दिघेंनी हॉस्पिटमध्ये असताना मला सांगितलेली 'ती' गोष्ट', कदमांचा खळबळजनक आरोप

 

 

 

राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.

हे ही वाचा>> Cabinet Meeting: मोठी भरती, भत्त्यांमध्ये वाढ... शिंदे सरकारने Cabinet बैठकीत 'हे' मोठे निर्णय

यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली.   

    follow whatsapp