CM Moham Yadav: मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री (Madhya Pradesh) म्हणून आता मोहन यादव यांच्या गळ्यात माळ पडली. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण त्याहीपेक्षा धक्कादायक हे आहे की, त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास. या सगळ्या आधी भाजप कार्यालयात नवनिर्वाचित आमदार आणि केंद्रीय निरीक्षकांचे फोटो सेशन पार पडले होते. भाजपचे अनेक बडे नेते या फोटो सेशनसाठी उपस्थित होते, मात्र डॉ.मोहन यादव (Dr. Mohan Yadav) अगदी मागच्या रांगेत बसले होते. त्यामुळे आता मोहन यादव यांच्यावर पक्ष एवढी मोठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवेल याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.
ADVERTISEMENT
चौहान यांनीच ठेवला प्रस्ताव
भाजपच्या या फोटो सेशनमध्ये मोहन यादव हे तिसऱ्या रांगेत बसले असले तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मात्र त्यांनी सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव हायकमांडसमोर ठेवला होता. त्यानंतरच विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
हे ही वाचा >> MLA Disqualification Case : “तसं करून आपण अपात्रतेची कारवाई ओढवून घेतली आहे”
राजकारणातील दबदबा
मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. ते संघाच्या जवळचे मानले जाते. शिवराज सरकारमध्ये ते उच्च शिक्षणमंत्री होते. तर 2013 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. मार्च 2020 मध्ये शिवराज सरकारच्या पुनर्स्थापनेनंतर जुलैमध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. तर 2 जुलै 2020 रोजी शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात त्याचा दबदबा वाढत गेला.
काँग्रेस नेत्याचा केला पराभव
मोहन यादव यांचा जन्म 25 मार्च 1965 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. ते अनेक वर्षे भाजपसोबत होते. त्याचबरोबर ते सलग तिसऱ्यांदा आमदारही झाले आहेत. उज्जैन दक्षिण मतदारसंघातून भाजपचे मोहन यादव यांनी काँग्रेसचे चेतन प्रेम नारायण यांचा 12941 मतांनी पराभव केला होता.
विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय
मोहन यादव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली होती. विद्यार्थीदशेपासूनच ते राजकारणात सक्रिय होते. 1982 मध्ये ते माधव सायन्स कॉलेजचे जॉईंट सेक्रेटरी झाले होते. त्यानंतर 1984 मध्ये ते अध्यक्ष झाले. 1984 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उज्जैनचे शहर मंत्री पदापर्यंत ते पोहोचले होते.
हे ही वाचा >> प्रियकराच्या आईला खांबाला बांधलं अन् विवस्त्र करून…गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांचं सैतानी कृत्य
नंतर 1988 मध्ये त्यांना ABVP चे राज्य सहसचिव आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आले. 1989-90 पर्यंत ते परिषदेच्या राज्य युनिटचे राज्यमंत्री झाले. या त्यांनी यशाच्या पायऱ्या चढत त्यांनी 1991-1992 मध्ये त्यांनी परिषदेचे राष्ट्रीय मंत्रीपदापर्यंत प्रवास केला.
आरएसएसचे सहखंड कार्यवाह
1993-1995 मध्ये ते आरएसएसच्या उज्जैन शाखेचे सहखंड कार्यवाह झाले. तर 1997 मध्ये ते बीजेवायएमच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्यही झाले. पुढे 1998 मध्ये ते पश्चिम रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य झाले तर 1999 मध्ये त्यांना बीजेवायएमच्या उज्जैन विभागाचे प्रभारी बनवण्यात आले.
पद आणि प्रतिष्ठा
2000-2003 मध्ये ते विक्रम विद्यापीठ, उज्जैनच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. 2000-2003 मध्ये त्यांना भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस बनवण्यात आले. 2004 मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचेही ते सदस्य झाले. त्यानंतर 2004 ते 2010 पर्यंत ते उज्जैन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. 2008 पासून भारत स्काउट्स आणि गाईड्सचे जिल्हाध्यक्ष झाले. 2011-2013 मध्ये मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
अनेक पुरस्कारांचे मानकरी
त्यांनी जसे वेगवेगळ्या पदावर काम केले आहे त्याच बरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. त्यांना उज्जैनच्या सर्वांगीण विकासासाठी एनआरआय संस्था शिकागो (अमेरिका) कडून महात्मा गांधी पुरस्कार, इस्कॉन इंटरनॅशनल फाऊंडेशनचा गौरव पुरस्कार, तर मध्य प्रदेशातील पर्यटनाच्या निरंतर विकासासाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT