‘औरंगाबाद,उस्मानाबादची नावं बदलणारे लोकं क्षुद्र’, भालचंद्र नेमाडे संतापले!

मुंबई तक

26 Apr 2023 (अपडेटेड: 26 Apr 2023, 07:31 AM)

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराची नावं बदलून काही साध्य होणार नाही.या शहराची नावं बदलणारे क्षुद्र लोक होते, असे मत ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी मांडलेय.

senior writer Bhalchandra Nemade has opined that it was petty people who changed the names of this city.

senior writer Bhalchandra Nemade has opined that it was petty people who changed the names of this city.

follow google news

Bhalchandra Nemade : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराची नावं बदलून काही साध्य होणार नाही.याऐवजी औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा. या शहराची नावं बदलणारे क्षुद्र लोक होते, असे मत ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी मांडलेय. या शहराच्या नामांतरावरून आधीच वाद सुरु असताना आता हा वाद आणखीण पेटण्याची शक्यता आहे. (bhalchandra nemade reaction people changing the name of Aurangabad Osmanabad are petty)

हे वाचलं का?

जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांची सह्याद्री देवराई संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात आली. आता या देशी बियाणांची रोप संपूर्ण महाराष्ट्रात लावली जाणार आहेत. यानिमित्त ते एबीपी माझाशी बोलते होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादवर परखड मत मांडलेय.

हे ही वाचा : मुख्यमंत्री तीन दिवस सुट्टीवर? एकनाथ शिंदे म्हणाले, मी तर…

भारतात लोकशाही खरंच धोक्यात आली आहे. खऱं बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणात फिरावं लागत आहे. मला धमकीचे पत्र आल्याने मला त्रास झाल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीची अंताची सुरुवात झाली असल्याचे देखील नेमाडे म्हणाले आहेत. ज्या मातीतून आपण उगवलो, त्या मातीशी कृतज्ञ राहणे म्हणजे देशीवाद आहे.कम्युनिस्टांनी जातीचे वास्तव नाकारले,त्यामुळे ते संपले आहेत, असे नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी म्हटलेय.

तसेच इंग्रजी शाळेत शिकणारी मुले काहीच करू शकत नाही.त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. प्रमाण भाषा असं काही नाही.प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आणि शुद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट म्हटले. इंग्रजांनी मराठी भाषेचा कोष करण्याचे काम चित्पावन ब्राम्हणांना दिले होते. त्यामुळेच ती प्रमाण भाषा पुण्यात मानली जाते. परंतू प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आहे.

हे ही वाचा : बारसूसाठी पंतप्रधानांना पत्र अन् ठाकरेंचा दुटप्पीपणा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या ‘हिंदू…जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीची खूप चर्चा झाली होती. या कादंबरीचा आता पुढचा भाग येणार आहे.या पुढच्या भागाबाबत भालचंद्र नेमाडे म्हणाले की,हिंदूच्या पुढल्या भागात खंडेराव हा पुरातत्व खात्यात नोकरी सुरु करतो. पुरातत्व संशोधन करत तो तक्षशीलेला पोहचतो. तेव्हा त्याला ग्रीस आणि युरोपातून इथे लोक शिक्षणासाठीये येत असल्याचे जाणवतं, असे कादंबरीत असणार असल्याची त्यांनी माहिती दिली

    follow whatsapp