Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) विजेता झाल्यानंतर जोरदार प्रसिद्धीझोतात आलेला एल्विश यादव आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यूट्यूबर (You Tuber) एल्विश यादववर अवैधरित्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच त्याचा तस्करी (smuggling) करणाऱ्या काही माणसांचा संबंध असल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशात घडलं असलं तरी आता महाराष्ट्रातही एल्विश यादवमुळे प्रकरण तापले आहे. एल्विश यादववर नोएडा पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार घणाघात केला आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. शाल,श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
गणपतीनिमित्त एल्विश वर्षावर
एल्विश यादववर अवैधरित्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि तस्करी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती पूजनानिमित्त एल्विशला वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचे आदरतिथ्य करण्यात आले होते. त्यावरुनच त्यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange : CM शिंदे म्हणाले, ‘सरसकट नाही’, जरांगेंनी गोंधळ केला दूर
गंभीर गुन्ह्यात अटक
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते. त्याला सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
रोल मॉडेल बनवण्यात हातभार
एल्विश यादव हा महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन विक्री करणाऱ्या अशा आरोपी लोकांचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादवसारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का ?
असा गंभीर सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी असा वाद रंगला आहे.
शासकीय पाहुणचार झोडतो
आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो आहे. त्यानंतर त्याला पळवून लावले जाते आणि इथे वर्षावर तर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे. एल्विश यादववरुन आता विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरल्यामुळे हा वाद आणखी चिघळणार का असा सवाल करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT