Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'बद्दल भाजपचं काय ठरलं?

मुंबई तक

20 Jul 2024 (अपडेटेड: 20 Jul 2024, 12:25 PM)

Vidhan Sabha election 2024 : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक अजित पवारांच्या राष्ट्रवादी शिवाय लढण्याचा सूर काही नेत्यांनी लावला होता. अखेरत दिल्लीत याबद्दलचा झालेला निर्णय महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. 

अजित पवारांना युतीत ठेवायचं की नाही, भाजपचा निर्णय झाला.

महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक

point

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीवर चर्चा

point

दिल्लीतील नेत्यांचा मेसेज महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत

Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत बसलेला जबर फटक्यानंतर भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी विधानसभेला अजित पवार सोबत नको असा सूर लावला. अजित पवारांना युतीत घेतल्याने भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार, याबद्दलची चर्चा होती. त्यावर अखेर पडदा पडला आहे. दिल्लीत झालेला निर्णय भाजपचे महाराष्ट्र प्रभारींनी कोअर कमिटी बैठकीत राज्यातील नेत्यांना दिला. 

हे वाचलं का?

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थिती कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थिती होते. 

एकनाथ शिंदे-अजित पवारांबद्दल भाजपची भूमिका काय?

या बैठकीत महाराष्ट्र प्रभारींनी सांगितले की, स्वबळावर लढण्याचा विचार करू नका. शिवसेना आणि अजित पवारांच्या ऱाष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊनच आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

हेही वाचा >> "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना सोबत घेऊन पुढे जायचे आपले वचन आहे. ते पूर्ण करायचे आहे. पक्ष नेतृत्वाचीही तीच भूमिका आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून तसेच एकनाथ शिंदे-अजित पवारांना विश्वासात घेऊन ठरवण्यात येईल, असे यादव यांनी या बैठकीत सांगितले. 

बैठकीत काय झाली चर्चा?

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे दिंडोरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर आणि बुलढाण्यात फटका बसल्याचा मुद्दा काही नेत्यांनी मांडला. त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमुळे जालना आणि पालघरमध्ये फटका बसल्याचा आरोप करण्यात आला. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, अशी चिंता या व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा >> शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय 

जिथे अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. तिथे परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात यावी, असेही भूपेंद्र यादव यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

    follow whatsapp