BJP Candidate List : किती विद्यमान आमदारांना संधी, कुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं10 मुद्द्यांमध्ये विश्लेषण

मुंबई तक

20 Oct 2024 (अपडेटेड: 20 Oct 2024, 06:26 PM)

भाजपने नुकतीच आपली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारणावर सुद्धा परिणाम झाले आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं.

भाजपने जाहीर केलेल्या यादीचे वैशिष्ट्य

भाजपने जाहीर केलेल्या यादीचे वैशिष्ट्य

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपकडून 99 उमेदवारांची यादी जाहीर

point

भाजपने कुणाकुणाला दिला डच्चू?

point

कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी?

 भाजपने नुकतीच आपली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारणावर सुद्धा परिणाम झाले आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. त्यातच आता भाजपने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील कुणाकुणाला संधी मिळाली हे जाणून घेऊ. 

हे वाचलं का?

भाजपच्या यादीचं विश्लेषण 10 मुद्द्यांमध्ये

हे ही वाचा >>Manoj Jarange : जरांगेंची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा, कुठे-कुठे उमेदवार उभा करणार?

• एकूण 99 उमेदवार घोषित. त्यापैकी 89 भाजपचे विद्यमान आमदार
• 89 पैकी 82 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, म्हणजेच 93 टक्के आमदार पुन्हा मैदानात
• इतर 7 पैकी 5 तिकीट आमदारातील कुटुंबीयांना दिलीत. त्यामुळे एकूण 87/89 आमदारांना पुन्हा संधी.(98%).
• 2 जागांवर नवे उमेदवार.
• फुलंब्री मतदारसंघातील विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याने तिथे अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली. 
• तर दुसरी जागा कामठी आहे. जिथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि 4 टर्म आमदार 2019 मध्ये त्याचे तिकीट कापल्यानंतर पुनरागमन केले.

• 10 जागा अशा आहेत जिथे भाजपकडे एकही विद्यमान आमदार नाही.  2019 प्रमाणेच 5 उमेदवारांची पुनरावृत्ती.
• 2019 च्या विजयी उमेदवारांचं निधन झाल्याने एका मतदारसंघात कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली.
• 4 नवीन चेहरे आहेत. 
•  99 पैकी 95 उमेदवारांची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे पुन्हा तिकीट मिळणाऱ्यांचा दर 96% पर्यंत आहे. 

 

दरम्यान, राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडून गेल्या आहेत. राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे. त्यादरम्यान ही यादी जाहीर झाली असून, त्यानंतर सोशल मिडियावर अशा आशयाचा हा मेसेज सध्या तुफान व्हायरल होतोय. 

    follow whatsapp