Devendra Fadnavis : "आमची चूक झाली", उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई तक

12 May 2024 (अपडेटेड: 12 May 2024, 01:18 PM)

Devendra Fadnavis Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य केले.

उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस यांची टीका.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस.

follow google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

point

लोकसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र

point

उद्धव ठाकरेंना आधीपासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं -फडणवीस

Devendra Fadnavis Uddhav Thackeray : भाजपचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक मोठं विधान केले आहे, ज्याची चर्चा होत आहे. महाराष्ट्रात १९९९ मध्ये भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली होती. त्याचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंना घेरलं आहे. (Devendra Fadnavis stated that Uddhav Thackeray wanted to become Chief Minister since 1999)

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत फडणवीसांनी ठाकरेंबद्दल हे विधान केले आहे. फडणवीस यांनी नारायण राणे यांचाही उल्लेख केला आहे. 

ठाकरेंच्या आदरापोटी... फडणवीसांनी काय दिले उत्तर?

'उद्धव ठाकरे भाजपसोबत असायचे, तुम्ही त्यांना ओळखू शकला नाहीत का?', असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. 

या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "झालं खरं तसं. ते आमच्यासाठी वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र होते. काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही बोलायचो नाही. ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी श्रद्धेपोटी तसं वागायचो."

हेही वाचा >> महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत कारणं 

"खरे तर उद्धवजींना तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ मधील विधानसभा निवडणूक निकालांनंतर त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येईना म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले", असे फडणवीस म्हणाले. 

राणेंचा उल्लेख... फडणवीस ठाकरेंबद्दल काय बोलले?

"नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसं पाहिलं तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही, पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते", असे फडणवीस म्हणाले. 

"उद्धवजींना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचं वाटत असावं, असं वाटतं.एक उदाहरण देतो माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातलं. कोस्टल रोड हा ‘एमएमआरडीए’ किंवा ‘सिडको’कडून बांधला जावा त्यामुळे वेगानं काम होईल असं मी म्हणालो. उद्धवजी तसं म्हणाले नाही. महापालिका करेल. ते कशासाठी हे जनता जाणते", असे सांगत फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केले.

हेही वाचा >> शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! पहा संपूर्ण यादी 

'ते (उद्धव ठाकरे) भाजपला सोडून वेगळी आघाडी करतील असा संशय कधीच आला नाही?', असा प्रश्नही फडणवीसांना विचारण्यात आला. 

याला उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. उद्धवजी काँग्रेससोबत जातील असं कधीच वाटलं नाही. मनापासून सांगतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. आमची चूक झाली", असे फडणवीस म्हणाले. 

'२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रपणे सामोरे जाऊ नये, असं भाजपला वाटत होतं का?', या प्रश्नाला फडणवीसांनी होकारार्थी उत्तर दिले.

 

ते म्हणाले की, "हो, खरं आहे. पण, मोदीजींसह काहींना बाळासाहेबांच्या चिरंजिवाशी असं वागणं अयोग्य वाटलं. माझ्यासह बहुतेकांचंही तेच मत होतं. आमच्यात हिंदुत्वाचा बंध होता. त्या भावनांचा आदर करत आम्ही युती केली. काही जागांबद्दलचे त्यांचे आग्रह मान्य करून", असे फडणवीस म्हणाले. 

    follow whatsapp