बीड: आष्टीमधील जाहीर कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना टोमणा मारला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी यावरून धनंजय मुंडेंवर बराचा हल्लाबोल केला. अशातच आज (5 फेब्रुवारी) सुरेश धस आणि पंकजा मुंडे हे आमनेसामने आले. ज्यावेळी दोघांनीही एकमेकांना टोले लगावले.
ADVERTISEMENT
दरम्यान, यावेळी पंकजा मुंडेंनी खासदारकीला झालेल्या पराभवाची सल मात्र बोलून दाखवली. यावरून त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना फडणवीसांसमोरच टोमणाही मारला.
पाहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...
'मंचावर उपस्थित निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केलं आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा... या जिल्ह्याचे आमदार ज्यांना पहिल्यांदा 2009 मध्ये गुलाल लागला.. जो भाजपमधूनच लागला.. आणि आता 2024 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत ते.. ज्यांनी ही सभा आयोजित करण्यात आणि लोकं जमविण्यात योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोकं टाळ्या वाजवतायेत.'
'राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणलाय म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या जास्त टाळ्या वाजायला लागल्यात ते आदरणीय सुरेश अण्णा धस..'
हे ही वाचा>> Ajit Pawar: 'सुरेश धसला काय वाटतंय याच्याशी मला काही घेणं-देणं नाही', अजितदादा चिडले
'देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला... देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बाहुबली म्हणतात.. खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात.. आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतोय त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो. पण आज ममत्वभाव येतोय.. कारण तरुण कार्यकर्ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामी म्हणत होते. तर शिवगामी ही बाहुबलीची आई आहे.. त्यामुळे मला तुम्हाला पाहताना एक वेगळाच भाव आला.'
'शिवगामीचं वाक्य असतं.. सुरेश अण्णा धस.. कुठे गेले.. जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असंत.. मेरा वचनही है मेरा शासन..'
हे ही वाचा>> Suresh Dhas: "पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटे आणि...", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांनी उडवली खळबळ
'जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिलंय तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही.'
'आज या कार्यक्रमात सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. 2003 सालमधील उल्लेख केला. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा किस्सा सुरेश अण्णा धस यांनी सांगितला. अण्णा मी पण तुम्हाला अण्णा म्हणते बरं का.. तुम्हीच मला ताईसाहेब म्हणतात असं नाही.. जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्हीही देतो...' असं म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना बरेच टोमणे मारले.
ADVERTISEMENT
