Mumbai Tak Chavdi: "शंभर टक्के वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये येईल...", सुरेश धस यांनी दिली खळबळजनक माहिती

BJP Mla Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोप असलेल्या वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केलीय. अशा आमदार सुरेश धस यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.

Mla Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case

Mla Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case

मुंबई तक

• 08:51 PM • 01 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

point

"गेल्या दोन महिन्यांचा तपास घ्यावा, त्यानंतर..."

point

भाजपचे आमदार सुरेश धस मुंबई तकच्या चावडीत नेमकं काय म्हणाले?

BJP Mla Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणात आरोप असलेल्या वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केलीय. कोर्टाच्या मान्यतेनुसार कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंबई तकच्या चावडीत मोठी प्रतिक्रिया दिलीय.

हे वाचलं का?

मुंबई तकच्या चावडीत भाजपचे आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

वाल्मिक कराडला खंडणीच्या प्रकरणात अटक झालीय, खुनाच्या प्रकरणात झाली नाहीय. तुम्हाला असं वाटतं का त्यामध्येही वाल्किम कराड यांचा हात आहे? एकूण कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अवादा नावाच्या कंपनीने दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 302 किंवा इतर गुन्ह्यांमध्ये आजतरी ते आरोपी म्हणून अटक झालेले नाहीत. खंडणीच्या प्रकरणात एक किंवा दोन दिवसाच्या वर सेशन कोर्ट कधीही पीसीआर देत नाही. ज्या अर्थी कोर्टाने 14 दिवसांचा पीसीआर दिलाय, त्याचा अर्थ असा आहे, आका (वाल्मिक कराड) जे लवकर अटक होत नव्हते.

हे ही वाचा >> Jalgaon Paladhi Curfew : गुलाबराव पाटील यांच्या गावात असं काय घडलं की थेट संचारबंदी लागू करावी लागली?

""मला वाटतं त्यांच्या त्यांच्यात द्वंद चालला असेल, एक म्हणत असेल सरेंडर व्हा, एक म्हणत असेल नको होऊ, म्हणजे आका आणि आकाचे आका..सध्य स्थितीत त्यांना त्या गुन्ह्यात दाखल केलेलं नाही. पण मला वाटतं याची गेल्या दोन महिन्यांचा तपास घ्यावा. हे प्रकरण घडायला कारणीभूतच आका आहेत. त्यांनीच ऑर्डर सोडलेली आहे. दोन महिन्यापूर्वी अवादा कंपनीच्या कोणत्या व्यक्तीला तिथे नेलं होतं, पहिल्यांदा 50 लाख रुपये त्यांना दिले होते. विष्णू चाटे, त्यांचे सहकारी सुदर्शन घुले घेऊन गेले होते का? ते परत आले होते का? हे कुणाच्या सांगण्यावर पाठवले? या सगळ्याची कडी तपासली तर माझं मत आहे की, वाल्मिक कराड शंभर टक्के खंडणीच्या गुन्ह्यात आता जरी आरोपी असले, तर पुढच्या रिमांडमध्ये त्यांचं नाव 302 मध्ये येईल", असंही धस म्हणाले.

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादांच्या आईने पांडुरंगाकडे केली 'ही' मागणी, थेट विठुरायाला घातलं साकडं!

वाल्मिक कराडांसारख माणूस जो लोकप्रिय आहे, त्या शोधणं इतकं कठीण जातं आणि शेवटी तो स्वत:च पोलिसांकडे जातो, यात पोलिसांचं यश कसं काय? यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले, तसं काही झालेलं नाहीय. पोलिसांकडून काही ज्या टीम्स बनवण्यात आल्या आहेत, त्या टॉप सिक्रेट ठेवल्या. टीमबाबत सांगितलं नाही. बरेच पोलीस त्यांच्या पाठीमागे लागले होते. हे (वाल्मिक कराड) जिथे होते, तिथल्या भांडी घरकाम करणाऱ्या महिलेपर्यंत पोलीस पोहोचले होते, असं मला माहिती आहे. ते पकडणार त्यापूर्वीच ते सरेंडर झाले आहेत.

    follow whatsapp