सुरेश धसांचा नवा लेटर बॉम्ब... 'त्या' भेटीनंतर धनंजय मुंडे पुन्हा टार्गेटवर?

भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडली आहे. कृषी खात्यातील खरेदी व्यवहारांची माहिती मिळावी यासाठी धस यांनी प्रधान कृषी सचिवांना पत्र लिहलं आहे.

सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका

सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका

मुंबई तक

• 11:22 AM • 17 Feb 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदार सुरेश धस यांचं प्रधान कृषी सचिवांना पत्र

point

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक

point

कृषी विभागातील काही निर्णयांची माहिती देण्यात यावी अशी केली पत्राद्वारे मागणी

योगेश काशिद, बीड: भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधानसभेपासून रस्त्यापर्यंत जोरदार आवाज उठवला होता. पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे यांची बंद दाराआड भेट घेतल्याने त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती.  'संतोष देशमुखांचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील, असं कधीही वाटलं नव्हतं.' असं म्हणत मनोज जरांगेंनी सुरेश धसांवर बरीच आगपाखड केली होती. अशावेळी आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात एक नवी आघाडी उघडली आहे. 

हे वाचलं का?

सुरेश धस यांनी राज्याच्या प्रधान कृषी सचिवांना एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मागील कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती मागितली आहे. त्यामुळे आता सुरेश धस हे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा>> Jitendra Awhad : "दोन-तीन महिने जे झालं ते...", धस-मुंडेंच्या भेटीनंतर काय म्हणाले आव्हाड?

कृषी विभागातील 'त्या' निर्णयांची माहिती देण्याची केली पत्राद्वारे मागणी

आमदार सुरेश धस हे पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. तकालीन कृषिमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलय. 

या पत्रात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेला आहे. यामधे खालील चार बाबींची प्रामुख्याने मागणी केली गेली आहे.

1) तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती देखील या पत्राद्वारे मागवली आहे. 

2) 2020 ते 2025 पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहिती मागविण्यात आली आहे. 

3) कापूस सोयाबीन तेलबियांचे उत्पादकता देण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती देण्याची मागणी. 

4) कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वेगवेगळ्या तक्रारी आल्याचे सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा>> Suresh Dhas : सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्यात काय चर्चा झाली? सुरेश धस म्हणाले, "या लोकांना फाशी होईपर्यंत..."

'खरेदीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार', सुरेश धसांचं पत्र जसाच्या तसं...

महोदय,

उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आलेल्या कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास साठी विशेष कृती योजनेमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाद्वारे करण्यात आलेल्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याबाबत तक्रारी वेगवेगळ्या स्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. तसेच मां. हायकोर्टात देखील याचिका दाखल झालेल्या आहेत. 

या संदर्भात विशेष कृती योजनेतील कार्यक्रमात भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने, तत्कालीन कृषी मंत्री कार्यालय तसेच आपल्या कार्यालयातील काही अधिकारी तसेच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील काही अधिकारी व कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी व तत्कालीन कृषी मंत्री या सर्वांच्या संगनमताने शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा व भ्रष्टाचाराचा उघड करण्यासाठी व न्यायालयीन प्रक्रियेसाठी मला विधानसभेत याबाबत विचारणा करण्याची आवश्यकता असल्याने मला वर विषयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मां. कृषी मंत्री, कृषी मंत्री कार्यालय, प्रधान सचिव कृषी कार्यालय, आयुक्त कृषी कार्यालय, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यालय यामध्ये सभेसंदर्भात निधी वितरणा संदर्भात, अंमलबजावणी संदर्भात, निरनिराळ्या समित्यांच्या घेण्यात आलेल्या सभांच्या संदर्भात झालेला पत्रव्यवहार, घेतलेले निर्णय, टिपणी सहाय्यक पासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावर झालेल्या टिपण्यासह, प्रत्येकाने टिपणीमध्ये मांडलेल्या मतासह संपूर्ण नस्ती मला हवी आहे तरी कृपया मला ती त्वरित उलट टपाली देण्याबाबतची विनंती आहे.

    follow whatsapp