Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊमधील (Macau) एका कॅसिनोत (Casino) जुगार खेळतानाचा फोटो (Gambling Photo) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोविषयी बोलताना त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पहिल्यांदाच माध्यमासमोर येत त्यांनी थेट त्यांना उत्तर दिले. रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये पत्रकारांशी बोलतान त्यांनी संजय राऊत यांच्यापासून ते अगदी राहुल गांधी पर्यंत यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
राजकारणाची पातळी घसरली
मकाऊ येथे कुटुंबीयांसोबत सहलीला जाऊन आल्यानंतर आणि संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्यांनी टीका केली त्यांनाच कॅसिनोतील जुगाराविषयी सविस्तर माहिती असू शकेल. मकाऊमध्ये ज्या ज्या हॉटेलमध्ये तुम्ही जाता त्या त्या हॉटेलमध्ये कॅसिनो हे असताताच ते पार करुनच पुढं जावे लागते. मात्र ज्या प्रकारे ज्यांनी कोणी हा फोटो शेअर केला त्यावरून इतकंच वाटत आहे की राजकारणाची पातळी घसरली आहे.
खालच्या पातळीवरची टीका
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या प्रकारे कॅसिनोतील फोटोवरुन राजकारण केले गेले आहे. त्याचा त्रास माझ्या कुटुंबाला झाला आहे. कारण गेल्या कित्येक दिवस घरी गेलो नव्हतो मात्र आता फक्त तीन दिवस कुटुंबीयांसोबत गेलेलो असतानाही या प्रकारे फोटो व्हायरल करुन खालच्या पातळीवरची टीका करणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा>> 300 रूपयांसाठी नग्न केलं, नंतर धारदार शस्त्राने… ठाण्यात मुलासोबत नेमकं काय घडलं?
महायुतीचे उमेदवार विजयी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलतान त्यांनी भाजपच्या भविष्यातील राजकारणाविषयीही माहिती दिली. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपकडून चाललेली तयारी कशा पद्धतीने चालली आहे त्यावरही त्यांनी सांगितले. भाजपकडून लोकसभेसाठी 45 जागा कशा निवडून आणता येतील आणि विधासभेसाठी महायुतीचे उमेदवार कशा पद्धतीन निवडून येतील त्याविषयीही त्यांनी सांगितले.
कल्याण हाच उद्देश
भारतीय जनता पक्षाकडून आता सत्तेपासून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे कल्याण हाच उद्देश ठेवून राजकारण केले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार निवडून येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इमेज खराब होत नाही
कॅसिनोतील फोटोवर बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही फोटोच्या आधारावर कोणाचीही इमेज खराब करता येत नाही. कारण त्यासाठी कष्ट केलेले असतात आणि त्यातून एक इमेज तयार झालेली असते. मी स्वतः गेल्या 34 वर्षापासून राजकारणाच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे अशा एखाद्या फोटोने इमेज खराब करता येत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT