‘…म्हणून मामाने तर जुगाड केला’, बावनकुळेंचा नेमका रोख कोणाकडे?

मुंबई तक

• 09:14 AM • 30 Nov 2023

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी हिम्मत असेल तर इंडिया आघाडीतून बाहेर पडावे असं जाहिरपणे आव्हान केले होते. त्यामुळे त्यांच्यातील दरी वाढत गेली होती, मात्र आता बावनकुळेंनी रक्षा खडसेंची भेट घेतल्यामुळे आता आणखी नव्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

bjp state president chandrashekhar bavanukale criticized eknath Khadse discussed seat of lok sabha raksha khadse

bjp state president chandrashekhar bavanukale criticized eknath Khadse discussed seat of lok sabha raksha khadse

follow google news

Chandrashekhar Bawankule : सरकारने महिलांसाठी आरक्षणाचा (Women Reservation) कायदा केला आहे. मात्र त्या कायद्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत आमचं काय होणार? असा सवाल विचारत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपलाच टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी महिला आरक्षणावरून अनेक सवाल उपस्थित करून म्हणाले की, आमच्या जागी महिल्या असल्या तर काय होईल? हे माहिती नाही. मात्र मामाने तर जुगाड केला आहे म्हणून मामाच्या जागी मामी येईल म्हणत त्यांनी आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली आहे.

हे वाचलं का?

महिला आरक्षणाचा कायदा संसदेत पास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, देशाला वाचवण्याचे काम महिलांनी केले आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्यासारखी उदाहरणं आपल्या समोर आहेत. या उत्तुंग व्यक्तिमत्वांना डोळ्यासमोर ठेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आरक्षणाचा कायदा संसदेत पास केला.

हे ही वाचा >> Ajit Pawar : ‘अरे कशा करता?’, अजित पवार संजय राऊत, रामदास कदमांवर कडाडले

देशातील महिलांना संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या महिला आरक्षणामुळे आता देशातील 191 महिला या खासदार बनणार आहेत, तर 100 महिला या आमदार होणार आहेत. महिलांसाठी 33 टक्के आरक्षण प्राप्त झाल्यामुळेच देशातील महिलांना ही संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

कमळाचंच बटण दाबतील

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिलांच्या आरक्षणावर बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांच्या सभांना लोकं गर्दी करतील, मात्र निवडणुकीची वेळ आली की, कमळाचंच बटण दाबतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.महिला आरक्षण आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार रक्षा खडसे यांनी भेट घेतल्याने आता राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यांच्या मुक्ताईनगरमधील घरी जात त्यांनी त्यांच्यासोबत चहा नाश्ता केला. यावेळी त्यांनी लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

सुनेच्या भेटीनंतर जोरदार चर्चा

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांनी जाहीर आव्हान केले होते. ते म्हणाले होते की, तुमच्यामध्ये धमक असेल तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा असं त्यांनी जाहिरपणे सांगितल्यानंतर त्यांच्यातील दरी आणखीनच वाढली होती. त्यामुळे आता त्यांच्या सुनेची त्यांनी भेट घेतल्याने आता पुन्हा राजकीय चर्चांना उधान आले आहे.

    follow whatsapp