BJP : अजित पवारांवर आधी टीका केली, आता फडणवीसांकडे संरक्षणाची मागणी; महायुतीत चाललंय काय?

मुंबई तक

27 Jun 2024 (अपडेटेड: 27 Jun 2024, 09:25 PM)

Sudarshan Chaudhari News : सुदर्शन चौधरी यांचा भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते थेट पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ॲाफीसमध्ये घुसले होते.

bjp sudarshan choudhari criticize ajit pawar now demand protection from devendra fadnavis

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते थेट पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ॲाफीसमध्ये घुसले होते.

follow google news

Sudarshan Chaudhari Video Viral : ''अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको', 'अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा', असे विधान भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी (Sudarshan Chaudhari) यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले होते. या संदर्भातला चौधरी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता चौधरी यांच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्याकडे संरक्षणाची मागणी करण्याची वेळ आलीय. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. (bjp sudarshan choudhari criticize ajit pawar now demand protection from devendra fadnavis)

हे वाचलं का?

सुदर्शन चौधरी यांचा भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते थेट पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ॲाफीसमध्ये घुसले होते. यावेळी त्यांनी ऑफिसमध्ये जोरदार घोषणाबाजी केली होती. 

हे ही वाचा : पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट

या सर्व घटनेनंतर सुदर्शन चौधरी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ॲाफीसमध्ये राष्ट्रवादीचे गुंड येऊन घोषणाबाजी करत आहेत, माझ्या जिवितास धोका निर्माण झाला असून देवेंद्रजी मला संरक्षण द्यावे हि विनंती आहे, असे सुदर्शन चौधरी यांनी म्हटलं आहे. तसेच सुदर्शन चौधरी यांनी पुणे पोलिसांना देखील टॅग केले होते. त्यामुळे या घटनेने महायुतीत चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सुदर्शन चौधरी व्हिडिओत काय म्हणाले? 

गेल्या 10 वर्षापासून आम्ही ज्यांना विरोध केला, त्या राष्ट्रवादीच्या अजित दादांनी तुम्ही आमच्या बोकांडी बसवलं आहे. त्यामुळे अक्षरश कार्यकर्त्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. भाजपच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यापासून ते तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. महायुतीत अजित दादा असतील आणि विधानसभेला जर सत्ता आणायची असेल, ती सत्ता कार्यकर्त्यांना नको आहे. काय गरज आहे अजित दादांसाठी सत्ता आणायची. तिकडे त्यांनी पालकमंत्री असताना आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचं. अशी सत्ता आम्हाला नको, असा निर्धार या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला होता. 

अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय.पालकमंत्री म्हणून दादा आमच्या बोकांडी आहेत. त्यामुळे अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ता नकोय, अशी खदखद भाजप कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांच्यासमोर बोलून दाखवली. 

हे ही वाचा : ''पंकजा मुंडेंना धोका दिला'', शिंदेंच्या नेत्याच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

तुम्हाला कार्यकर्त्यांचा सल्ला आणि मन जाणून घ्यायचं असेल तर अजित दादांना महायुतीतून  बाहेर काढा. सुभाष बापू, राहुल दादा आणि योगेश दादांवर त्यांनी अन्याय केला.हे तिघे मंत्री झाले असते. त्यामुळे महायुतीत अजित दादा असतील आणि विधानसभेला जर सत्ता आणायची असेल, ती सत्ता कार्यकर्त्यांना नको आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, असा कार्यकर्त्यांचा सूरू होता. 

    follow whatsapp