Mood of the Nation : गेल्या काही दिवसांपासून देशात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका (Lok sabha) काही दिवसांवर आल्या आहेत. त्या निवडणुका होण्याआधीच इंडिया टुडे आणि सी व्होटरकडून संयुक्तपणे 'मूड ऑफ द नेशन' (mood of the nation) सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
आगामी लोकसभेचं चित्र
या सर्व्हेक्षणामध्ये सर्व 543 लोकसभा मतदारसंघातील सुमारे 35-38 हजार लोकांशी संवाद साधण्यात आला आहे. सर्व्हेक्षणाच्या आधारे आज तकच्या टीमकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, आता निवडणुका झाल्याच तर तर प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार आणि आगामी निवडणुकीचं नेमकं चित्र काय असणार ?
भाजपचं गणित
या सर्वेक्षणानुसार भाजप युतीला यूपीमध्ये 80 पैकी 72 जागा मिळत आहेत, तर उत्तराखंडमधील पाचही जागा, हिमाचलमधील चारही जागा, हरियाणामध्ये 10 पैकी 8, पंजाबमध्ये 2, मध्यप्रदेशात 29 पैकी 27 जागा मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा दिसत आहेत.
हे ही वाचा >>MOTN 2024: लोकसभेत मध्यप्रदेशात भाजपची गणितं बिघडणार?
दिल्लीकरांच्या मनात
दिल्लीत झालेल्या मूड ऑफ दे नेशन सर्व्हेमध्ये एक चित्र स्पष्ट झाले की, भाजप पुन्हा एकदा दिल्लीत क्लीन स्वीप करताना दिसत आहे. दिल्लीतील सातही जागा भाजप जिंकू शकते तर त्याचवेळी जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर आम आदमी पार्टी तिसऱ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला मताधिक्य?
या सर्व्हेमध्ये भाजपला 56 टक्क्यांहून अधिक मतं मिळतात, तर काँग्रेसला 22 टक्क्यांहून अधिक मतं मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला 18 टक्क्यांहून अधिक मतं मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT