Vidhan Sabha Election 2024: ..तर महायुती-महाविकास आघाडीचा टप्प्यात कार्यक्रम, अपक्ष करणार खेला होबे?

मुंबई तक

• 11:11 PM • 16 Oct 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण अनेक अपक्ष यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडीची गणितं बिघडविण्याची शक्यता आहे.

महायुती-महाविकास आघाडीचा टप्प्यात कार्यक्रम

महायुती-महाविकास आघाडीचा टप्प्यात कार्यक्रम

follow google news

बातम्या हायलाइट

point

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष

point

1995 च्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू

point

अपक्ष ठरणार महायुती आणि मविआसाठी डोकेदुखी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं असून येणाऱ्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल समोर येणार आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून आहे. या निवडणुकांनंतर राज्यात नेमकं काय चित्र असेल याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच 1995 च्या निवडणुकीचा सुद्धा या चर्चांमध्ये उल्लेख केला जातोय. या चर्चेसाठी कारण आहे या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष उमेदवार. कारण या निवडणुकीत मुख्य प्रवाहातील पक्ष वगळता, इतर लहान पक्ष आणि अपक्ष असे तब्बल 59 उमेदवार निवडून आले होते. (not just mahavikas and mahayuti a third alliance is also ready in maharashtra will independents win like in 1995)

हे वाचलं का?

अपक्षांनी कसं बदलेलं विधानसभेचं चित्र... 

1995 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही लहान पक्ष आणि अपक्षांचा बोलबोला राहणार असं चित्र सध्या महाराष्टात दिसतंय. 1995 सालच्या या निवडणुकीत काँग्रेसला 80, शिवसेनेला 73, भाजपाला 65 आणि जनता दलला 11 जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे तब्बल 45 अपक्ष उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवला होता.

हे ही वाचा>> Diwali Bonus: निवडणूक जाहीर होण्याआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून 'एवढ्या' हजारांचा बोनस जाहीर

याव्यतिरिक्त महाराष्ट्र विकास काँग्रेसचा एक, नाग विदर्भ आंदोलन समितीचा एक, समाजवादी पक्षाचे तीन, सीपीआयचे तीन आणि पीजंट्स अँड वर्कर्स पार्टीचे 6 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे मोठ्या पक्षांव्यतिरिक्त निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या तब्बल 59 पर्यंत पोहोचली होती. 

महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गणित बिघडवलं होतं. एमआयएमने फक्त छत्रपती संभाजीनगरची एक जागा लढवली होती, मात्र एमआयएमने वंचितच्या सर्व जागांवर प्रचारासाठी ताकद लावली होती. तेव्हा वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता, मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार पडण्यासाठी या आघाडीला कारणीभूत धरलं जात होतं.

हे ही वाचा>> Manoj Jarange : ''मराठ्यांची लेकरं भिकारी करण्यासाठी फडणवीसांनी...'', जरांगे कडाडले!

यंदाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 19 सप्टेंबरला 'परिवर्तन महाशक्तिची' स्थापना झाली. संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि अन्य काही लहान पक्षांना घेऊन तयार करण्यात आलेल्या या आघाडीने पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. 

तसंच दुसरीकडे वंचित, एमआयएम आणि मनसेही या निवडणुकीत स्वतंत्र लढणार असल्याचं सध्या चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीव्यतिरिक्त या पक्षांचंही महत्व वाढलेलं आहे.

दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष आमदार कुणाला पाठिंबा देणार यावरुन वेगवेगळी समीकरणं तयार केली जात होती. मात्र, या सर्व आमदारांनी त्यावेळी शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसंच अनेक अपक्ष आमदारांनाही या सरकारमध्ये मानाचं पान मिळालं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात यंदाही लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवार महायुती आणि मविआचं भवितव्य ठरवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp