Suraj Chavan ED custody: मुंबई: शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर खिचडी घोटाळ्यावरून वाद-प्रतिवादाला सुरुवात झाली. सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर खिचडी घोटाळा नेमका कसा झाला यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. याच प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना कोर्टातही हजर केलं. मात्र, त्यांच्या जामिनावर सध्या कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. (bmc khichdi scam shiv sena ubt leader suraj chavan produced in court strong argument of ed to get custody)
ADVERTISEMENT
गरीबांची खिचडी नेमकी खाल्ली कोणी?
कोविड काळात परप्रांतीय मंजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने मुंबई महापालिकेने या मजुरांना मोफत खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेतला. पण खिचडी वाटप करताना ती 300 ग्रॅमऐवजी 100 ग्रॅमच देण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करत सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
EOW न दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर ईडीने ECIR दाखल केला ज्यानंतर या सगळ्या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी सुरू झाली.
हे ही वाचा>> Maharani 3 Teaser : ‘महाराणी’ सत्तेच्या खुर्चीवर पुन्हा करणार राज्य, दमदार टीझर रिलीज!
या आर्थिक घोटाळ्यात सूरज चव्हाण लाभार्थी असल्याच्या आरोप ED ने केला आहे. कोविड काळात, गरीब आणि स्थलांतरितांसाठी बीएमसीने खिचडीची व्यवस्था केली होती. पण त्याच्या वाटपात भ्रष्टाचार केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या EOW विभागाने ही तक्रार नोंदवली होती.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना UBT सचिव सूरज चव्हाण यांच्यासह अनेक BMC अधिकाऱ्यांना चौकशीसाठी देखील बोलावण्यात आले होते.
ईओडब्ल्यूच्या तपासासोबतच ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. ईडीने खिचडी घोटाळ्यासंदर्भात सूरज चव्हाण यांच्यासह बीएमसीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तसेच शिवसेना UBT पक्षाच्या नेत्यांशी थेट संबंध असलेल्या निवडक कंत्राटदारांना कंत्राट देण्यासाठी सूरज चव्हाण यांनी बीएमसी अधिकार्यांना प्रभावित केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात सुमारे 6.37 कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा अंदाज आहे. निविदा प्रक्रियेसोबतच खिचडीचे बिलही अधिकचे दाखविण्यात आले आहे.
याआधी ईडीने तत्कालीन सहाय्यक महापालिका आयुक्त संगीता हसनाळे यांचीही चौकशी केली होती. गरीब आणि मजुरांना धान्य वाटपाची जबाबदारी ही हसनाळे यांच्यावर होती.
कोर्टात नेमकं काय घडलं?
सूरज चव्हाण यांना आज ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीच्या वकिलांनी कोर्टाला नेमकं काय सांगितलं ते जाणून सविस्तर
– फोर्स वन मल्टी हॉस्पीटॅलिटी या कंपनीच्या बाबतीत हा आरोपी निगडीत आहे
– आम्ही आरोपीला वेळोवेळी चौकशी केली आहे
– आम्ही लगेच अटक करत नाही
– असिस्टंट म्युनिसिपल कमिश्नर यांनी स्वतः सांगितले की आम्ही फोर्सवन क़पनीला कंत्राट दिले होते
– मात्र आरोपी नकार देतोय
– आठ कोटी ६४ लाखाचे हे कंत्राट दिले होते
– यानंतर खाली हे दोन सबकंपन्यांना कंत्राट दिले होते
– यात ३ कोटी ६४ लाखाचा नफा मिळवला
– पालिका एका पॅकेटचे ३३ रुपये देत होते
– मात्र खालच्या कंपन्यांकडून हे लोक १६ रुपयाने घेत होते
– आरोपीच्या खात्यात काही पैसे जमा झाले आहेत
– आमचे असे म्हणने आहे की यांना ते कंत्राट दिले होते
– स्नेहा कॅटरर्स आणि गोल्डन स्टार बँक्वेट यांच्या स्टेटमेट वरून हे स्पष्ट होतंय.
असा युक्तिवाद ईडीच्या वतीने कोर्टात करण्यात आला. जेणेकरून सूरज चव्हाण यांची ईडीला कोठडी मिळवता येईल.
हे ही वाचा>> Rajan Salvi “मला अटक करा, जेलमध्ये टाका, पण बायको…”, ठाकरेंच्या आमदाराचा दाटला कंठ
दरम्यान, सूरज चव्हाण यांच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला.
– त्याकाळात देशभरात लॉकडाऊन लागला होता, लोकं घरात अडकून पडली होती
– गरिबांकडे खायला अन्न नव्हतं, त्यामुळे पालिकेनं गरजूंना खिचडी वाटप केलं
– माफक दरांत काही कंत्राटदारांना खिचडी पुरवण्याचे काम देण्यात आलं
– या सर्व प्रक्रियेत सूरज चव्हाण यांचा कुठेही सहभाग नव्हता
– सूरज चव्हाण हा केवळ मोठ्या लोकप्रतिधींच्या संपर्कात असल्यानं सूरज चव्हाणला गोवण्यात आल्याचा आरोप
– दिलेल्या कंत्राटात सूरज चव्हाणांचा सहभाग असल्याचा आरोप आहे
– मात्र त्या आरोपांना कोणताही पुरावा नाही
अशाप्रकारचा युक्तिवाद हा सूरज चव्हाणच्या वकिलांनी केला आहे.
ADVERTISEMENT