Sada Sarvankar : राज्याच्या राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी मात्र मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता चर्चेला मोठे उधाण आले आहे. विधानसभेच्या उमेदवारीवरून नाराजीमुळे मला संजय राऊतांनी (Sada Sarwankar) मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे घर जाळायला सांगितले असा गौप्यस्फोट केल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. आमदार सदा सरवणकर यांनी बोलताना त्यांच्या ही घटना त्यांनी सविस्तरपणे सांगितली आहे.
ADVERTISEMENT
राऊतांनी घर जाळण्यास सांगितलं
शिवसेनेतून मला उमेदवारी मिळावी यासाठी मनोहर जोशी यांनी मला मातोश्रीवर ताकद दाखवायला सांगितली. मात्र त्याचवेळी माझी उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यावेळी मनोहर जोसी यांच्या घरावर मला हल्ला करण्याचा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी दिला असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या आरोपांवर काय उत्तर देतात त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा >> NCP Kolhapur : ‘उत्तरदायित्व पोहचवण्यासाठीच ही कोल्हापूरची सभा’, अजित पवार गटाने भूमिका मांडली
असाच जाऊ नकोस
मिलिंद नार्वेकर यांनी मला निरोप दिल्यानंतर तुमचं तिकीट मनोहर जोशींनी कापले आहे. त्यामुळे शिवसैनिक घेऊन तुम्ही जोशींच्या घरी घेऊन जा. तिकडे जात असताना त्याचवेळी संजय राऊतांचा फोन आला. त्यावेळी त्यांना मी खोटी उत्तरं दिली मात्र त्यांनी तू मनोहर जोशींच्या घरी चालला आहेस ना, मोर्चा घेऊ मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, आणि त्यांचे घर जाळून टाक, काहीच शिल्लक ठेऊ नकोस असंही त्यांनी सांगितल्याचा आरोप सरवणकर यांनी केले आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ‘…आता तुम्ही मशालीची धग अनुभवा’, ठाकरेंनी भाजपला सुनावलं
मातोश्रीचा आदेश ‘अंतिम’
शिवसैनिक हे मातोश्रीचा आदेश अंतिम मानतात. त्यामुळे मनोहर जोशींच्या घरी निघालो मात्र तिथे आधीच पंधरा ते वीस शिवसैनिक होते. त्याच बरोबर आजूबाजूला काही व्हिडिओ कॅमेरे लावण्यात आले होते. तरीही जे घडायचे होते ते घडलेच अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.
ADVERTISEMENT