Chhagan Bhujbal: छगन भुजबळ राष्ट्रवादीला करणार बायबाय? अजितदादांची सोडणार साथ? मोठी अपडेट आली समोर

मुंबई तक

• 02:46 PM • 16 Dec 2024

Chhagan Bhujbal Press Conference: महायुतीच्या 39 आमदारांनी काल रविवारी नागपूरच्या राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली.

Chhagan Bhujbal On Ajit Pawar

Chhagan Bhujbal On Ajit Pawar

follow google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला करणार बायबाय?

point

"जहां नहीं चैना वहां नहीं.."

point

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal Press Conference: महायुतीच्या 39 आमदारांनी काल रविवारी नागपूरच्या राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. परंतु, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे भुजबळ त्यांची नाराजी माध्यमांसमोर उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर दुसरीकडे भुजबळांचे समर्थक आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. 'जहां नहीं चैना वहां नहीं..', असं म्हणत भुजबळांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बायबाय करणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे भुजबळ नागपूरमध्ये अधिवेशनाला न थांबता थेट नाशिकला जाणार असल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

"सात आठ दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की, तुम्ही राज्यसभेवर जाणार होते, आता तुम्ही राज्यसभेवर जा. त्यावेळी मला राज्यसभेवर जायचं होतं. साताऱ्याला जागा दिली, तेव्हा त्यांनी मला दिली नाही. मला सांगितलं की तुम्हाला लढायला पाहिजे. तुमच्याशिवाय हे होणार नाही. तुम्ही लढत असाल तर पार्टी जोमाने पुढे जाईल. मी म्हणाले ठीक आहे, मी लढतो. मी लढलो आणि माझ्या मतदारसंघातील लोकांच्या आशिर्वादाने मी निवडून सुद्धा आलो. पक्षाकडून तुम्हाला काही सांगण्यात आलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळ म्हणाले, मी त्यावेळी त्यांना सांगितलं, मी ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघातील मतदारांसोबत ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल, असं भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा >> NCRB Crime Report : देशात दर तासाला 3 आणि दर 20 मिनिटाला एका महिलेवर अत्याचार, महाराष्ट्रात परिस्थिती कशी?

कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. ते ही माझ्या लोकांना दु:खदायक आहे. मी त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. त्यांनी मला जीवापाड प्रेम दिलं आहे, त्या मतदारसंघात मी अशाप्रकारे वागणार नाही. हे अजिबात मला अपेक्षित नव्हतं. मी ओबीसींच्या संरक्षणासाठी मैदानात आलो. त्यावेळी मी राजीनामा दिला आणि सांगितलं की मी आता लढणार आहे. जे जे कुणी आहेत, त्यांच्या विरोधात मी बोलणार आहे. त्यांनी आधी सांगितलं की, तुम्ही त्या राजीनाम्याबद्दल चर्चा करू नका. सभागृहात दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना मी माझी बाजू ठणकावून कायद्याप्रमाणे मांडली आणि मी पूर्णपणे त्या लढ्यात उतरलो. लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे, असंही भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा >> 16 December 2024 Gold Rate: सोनं खरेदी करण्याची गोल्डन चान्स! मुंबईत सोनं झालं 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

    follow whatsapp