Sindhudurg VIDEO: राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, राणे-ठाकरे समोरासमोर आले अन्...

मुंबई तक

28 Aug 2024 (अपडेटेड: 28 Aug 2024, 03:48 PM)

Sindhudurg : मालवणमध्ये मविआ आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. मालवणमध्ये मविआकडून निषेध मोर्चा सुरू आहे. मविआ आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राजकोट किल्ल्यावर हाय व्होल्टेज ड्रामा

point

नारायण राणे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने

point

ठाकरेंच्या पाहणीदौऱ्यावेळी राणे समर्थकांचा राडा

रिेतेश देसाई : BJP vs MVA activists Clash at Sindhudurg : सिंधुदुर्गातील मालवणमध्ये 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. सध्या या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत यांनी आज राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. त्याचवेळी नारायण राणे आणि निलेश राणे पाहणीसाठी किल्ल्यावर दाखल झाले. त्यामुळे भाजप आणि मविआ कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. (Chhatrapati shivaji maharaj statue collapsed aadity thackeray vs narayan rane clash between bjp MVA activists at malvan sindhudurg rajkot fort)

हे वाचलं का?

राजकोट किल्ल्यावर हाय व्होल्टेज ड्रामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या 8 महिन्यांत महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर आता हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : Sanjay Raut: 'फडणवीसांनी केसरकरांना जोड्याने मारलं पाहिजे'; महाराजांवरील वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक! 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने आज महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आलीये. यावेळी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील राजकोट दौऱ्यावर आले असताना तिथे भाजप खासदार नारायण राणे... निलेश आणि नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते. यासर्वात ठाकरे आणि राणेंचे समर्थक आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात तुफान राडा रंगला.

निलेश राणेंनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी भाजप आणि राणे समर्थकांनी मुख्य रस्ता अडवला. आदित्य ठाकरे यांनी गेलो तर मुख्य रस्त्यानेच जाणार, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. राणे आणि ठाकरे यांच्याकडून आव्हान-प्रतिआव्हान सुरू झाल्याने जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही स्थानिक आहे, पहिले त्यांना मागच्या दाराने जायला सांगा, असे निलेश राणे यांनी भूमिका घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी तुम्ही गेलात की ते 10 मिनिटांत जातील असे सांगितले.

हेही वाचा : Sanjay Raut: '...तर राणे आणि त्यांची मुलं रस्त्यावर ना&% नाचले असते', राऊतांची राणेंवर बोचरी टीका

अशा परिस्थितीत दीड-दोन तास आदित्य ठाकरेंनी राजकोट किल्ल्यावर ठिय्या आंदोलन केले. यासर्वात आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका करत म्हटलं की, “महाराष्ट्रात काही घडल्यास त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. पुतळ्यात भाजपने भष्ट्राचार करून दाखवला. भाजप म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे.”

  

 

    follow whatsapp