Uddhav Thackeary: उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या बालेकिल्ल्यात जात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शिवसेनेची शाखा पाडल्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. त्यावरुन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शाखा पाडल्याचे समजताच उद्धव ठाकरे यांनी काही क्षणात रवाना होत मुंब्रा शाखेची (Mumbra Shivsena Shakha Branch) पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांची अडवणूक करत त्यांना पाडलेल्या शाखेकडे न जाण्याची विनंती केली मात्र तरीही उद्धव ठाकरे यांनी शाखेकडे जात पोलीस बंदोबस्तातच त्यांनी पाहणी केली.
ADVERTISEMENT
यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत आमचे पोस्टर फाडले ना, आता आम्ही तुमची मस्ती फाडतो, फक्त निवडणुका येऊ दे असा थेट इशाराच त्यांनी शिंदे गटाला दिला आहे. त्यामुळे या शाखेवरुन वाद आणखी चिघळणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
अतिक्रमण केलेला तो खोका हटवा…
मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर ठाण्यासह मुंब्र्यात हायहोल्टेज ड्रामा घडला आहे. पोलिसांनी खोके सरकारला संरक्षण देत शिवसेनेच्या शाखा पाडू दिल्याचा आरोपही त्यांनी पोलिसांवर केला आहे. यावेळी ज्या शाखेवर शिंदे गटाने आक्रमण केले आहे, त्यांना थेट इशाराच दिला आहे. अतिक्रमण केलेला तो खोका हटवा नाही तर आम्ही तो उचलू म्हणत शिंदे गटाला त्यांनी आगामी निवडणुकीतही इशारा दिला आहे.
महाराष्ट्राची अब्रू गेली असती
ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने अतिक्रमण करुन शिंदे गटाने त्यावर दावा केला. त्यामुळे हा वाद टोकाला गेला आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या शाखेवर अतिक्रमण करुन शाखा ताब्यात घेतल्याने उद्धव ठाकरे यांनी काही वेळेतच मुंब्र्यात दाखल होत शिंदे गटाला ठणकावून सांगितले. यावेळी ते म्हणाले की, जर या शाखेवर मुंब्र्यात काही घडलं असतं तर आज महाराष्ट्राची अब्रू गेली असती अशी भावनाही त्यांनी यावेली व्यक्त केली.
हे ही वाचा>>Murder : फडणवीसांच्या नागपुरात BJP पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, मध्यरात्री ढाब्यावर काय घडलं?
हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवा
राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे आताही ठाकरे गटाच्या शाखेवर अतिक्रमण झाल्यावर मात्र ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंच्या बालेकिकिल्यात जाऊन शड्डू ठोकण्यात आला आहे. यावेळी त्यांनी फक्त तुमच्यामध्ये हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेऊन तुम्ही समोर या असा थेट इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे.
निवडणूक कोणतीही असूद्या
उद्धव ठाकरे यांनी अगदी सुरुवातीपासून शिंदे गटाला जोरदार इशारा देत आव्हान दिले आहे. यावेळीही त्यांनी निवडणूक कोणतीही असूद्या त्यांचे डिपॉझिट जप्त जप्त करा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते अगदी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत शिंदे गटाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा असं आवाहन त्यांनी केले आहे.
केसाला धक्का जरी लागला तर…
मुंब्र्यात आज शिंदे गट आणि ठाकरे गटाचा हायहोल्टेज ड्रामा पाहता आला. कारण शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेवर ताबा मिळवत शिवसेनेची शाखा ताब्यात घेतली. त्यावरुन दोन्ही गट आमनेसामने आले. ही घटना उद्धव ठाकरे यांना समजताच त्यांनी मुंब्र्यात जात शिवसैनिकांशी आणि शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, जर आज ठाण्यात काही बरं वाईट घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकरणावरून जर कोणत्याह शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला असता तर जनता त्यांचे केस उपटेल असा थेट इशाराच त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
शाखेची कागदपत्रे आमच्याकडे
पोलिसांनी शिंदे गटाला संरक्षण देत शिवसेनेच्या शाखेवर अतिक्रमण होऊ दिले असा थेट आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे. मात्र ज्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. मात्र त्या शाखेची कागदपत्रे आमच्याकडे आहेत असं त्यांनी शिंदे गटाला आणि पोलिसांनाही सांगितले आहे. तुम्ही तात्काळ त्यांचे ते डबडे हलवा नाही तर आम्ही काढून फेकू अशा भाषेतही त्यांनी ठणकावून सांगितले.
त्यांच्याकडे सगळी भाड्याची माणसं
शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मुंब्र्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी गद्दार, खोके सरकार म्हणत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. मुंब्र्यात उद्धव ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनाथ आणि विरोधातही जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे सगळी भाड्याची माणसं आहे म्हणत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. किराय का टट्टू कभी रेस का घोडा नहीं होता असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला.
सत्तेचा माज आलाय, त्यांच्यावर…
मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडल्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मुंब्रा दौरा केला. त्यावेळी शिंदे गटावर त्यांनी जोरदार टीका केली. आगामी काळातील कोणत्याही निवडणुकीत शिंदेंच्या नेत्यांची डिपॉझिट जप्त करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे ज्यांना सत्तेचा माज आलाय, त्यांच्यावर बुलडोजर फिरवणार अशा थेट इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT