CM Devendra Fadnavis: "दहा हजार लोकांना रोजगार..." ; वर्षाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांचं मोठं विधान!

CM Devendra Fadnavis : गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. 75 वर्षानंतर अहेरी-गर्देवाडा बस सुरु झाली असून फडणवीसांनी याचं उद्घाटनं केलं.

Devendra Fadnavis

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (फाइल फोटो)

मुंबई तक

01 Jan 2025 (अपडेटेड: 01 Jan 2025, 03:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वर्षाच्या पहिल्याच दिवशी CM फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया

point

"अनेक प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन..."

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis : गडचिरोली जिल्हाच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे. 75 वर्षानंतर अहेरी-गर्देवाडा बस सुरु झाली असून फडणवीसांनी याचं उद्घाटनं केलं. यावेळी फडणवीस म्हणाले, "मला विशेष आनंद आहे की, कोनसरीचा हा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना केलं होतं. आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन करत आहे. अनेक प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दहा महिन्यानंतर पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळत आहे"

हे वाचलं का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले? 

"आज दौरा हा अतिशय विशेष आहे. 75 वर्षानंतर अहेरी-गर्देवाडा बस चालू झाली आहे. त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे. पेनगुंड्याला नवीन आऊटपोस्ट तयार करून गडचिरोली जिल्ह्याची सगळी कनेक्टिव्हीटी छत्तीसगडशी करायची आहे, त्याचं कामदेखील सुरु केलेलं आहे. ज्या भागात माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं, आता तिथे आपलं वर्चस्व तयार झालं आहे. लोकांनी माओवाद्यांना नाकारलं आहे.

हे ही वाचा >> Walmik Karad Beed : वाल्मिक कराडने रात्री जेवण केलं नाही, सकाळी नाश्ताही टाळला? संध्याकाळी जेवायला काय मागितलं?

12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं. त्यांनी जे आयईडी लावले आहेत, ते सर्व पोलिसांकडे जमा केले आहेत. त्यामुळे एक नवीन पहाट गडचिरोली जिल्ह्यात तयारी झाली आहे. मी सांगायचो की याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा समजू नका. हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे. हा पहिला जिल्हा आहे", अशी मोठी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

हे ही वाचा >>  1 January 2025 Gold Rate: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं गडगडलं! मुंबईसह मोठ्या शहरांत 'इतक्या' रुपयांनी महागलं

"आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या चार वर्षात गडचिरोली किंवा महाराष्ट्रातला एकही तरुण किंवा तरुणी माओवादी संघटनांमध्ये सामील झाले नाहीत. नक्षलवाद्यांचे वरिष्ठ नेतृत्त्व ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहेत. लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे. आता तो माओवाद्यांवर नाही", असंही फडणवीस म्हणाले.

    follow whatsapp