CM Devendra Fadnavis Latest Speech : "पुण्यातील आंबेगाव परिसरात उभारलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज शिवजयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे. फणडवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवसृष्टीला आम्ही ५० कोटी रुपये देण्याची घोषणा करत आहोत. मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहेत , जिथं कमी पडेल तिथं सगळे मदत करू. एकनाथ शिंदे महाराजांना खूप मानतात आणि पुण्याचे काम असले की अजित पवार तर कधीच नाही म्हणत नाहीत. म्हणून जिथे जिथे कमी पडेल तिथे सरकार आपल्या पाठीशी असेल. शिवसृष्टी ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. आग्र्याच्या किल्ल्यावर महाराजांना कैदी करण्याचा मूर्खासारखा प्रकार औरंगजेबाने केला होता, आज तिथं शिवजयंती साजरी करणार आहोत. शिवसृष्टी बघून मी निःशब्द झालो आहे. मी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी गेलो सगळं पाहिलं पण जी प्रेरणा आणि भावना या थेटर मध्ये तयार झाली, ती अप्रतिम आहे".
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले, "महाराष्ट्र सह देशातील प्रत्येक विद्यार्थी इथे आलाच पाहिजे. त्याला योग्य पद्धतीने आपला इतिहास कळेल. खरंतर या विद्यार्थ्यांना अधिकच खरा इतिहास सांगितला पाहिजे होता. पण दुर्दैवाने तो सांगितला गेला नाही. विद्यार्थी इथं आले तर सगळा खरा इतिहास त्यांनी कळेल. ज्याने शिवसृष्टी बघितली नाही, त्याने जीवनातला एक वेगळा आनंद मिस केला आहे. आम्ही याला मेगा पर्यटनाचा दर्जा दिला असला तरी हे पर्यटन स्थळ नाही लोकांनी अभ्यास करण्यासाठी इथ यावं".
हे ही वाचा >> Eknath Shinde : "बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही घरगडी...", DCM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
"महाराज योगी होते आणि या खऱ्या योग्याचे मंदिर म्हणजे ही शिवसृष्टी आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. शिवराय लढवय्या तर होतेच जगातले एक उत्तम योद्धे आणि उत्तम प्रशासक होते. ज्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्या राज्यामध्ये होती. महिलांना योग्य न्याय आणि जातीवरून कोणावरही अन्याय होत नव्हता. अन्याय करेल त्याला शिक्षा होणारच, हा कायदा महाराजांनी बनवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यातील बारा किल्ले युनेस्को साठी नॉमिनेट केले आहेत. छत्रपती शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा म्हणून युनेस्को स्वीकारेल ही खात्री आहे. आपल्याला इथे स्वराज्याची राजधानी पाहता येणार आहे. महाराजांनी वृक्ष संवर्धन आणि जलसंवर्धन देखील आपल्याला शिकवलं. महाराज पर्यावरण प्रेमी देखील होते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा >>TATA Group ब्रीच कँडी रुग्णालयात करणार तब्बल 500 कोटी रुपयांची गुंतवणूक, नावही बदलणार?
ADVERTISEMENT
