CM Eknath Shinde and Sharad Pawar meet varsha bunglow : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात भेट झाली.साधारण अर्धा तासांच्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली.या बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेतील अशी चर्चा होती.मात्र दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद टाळली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी फोन लाईनद्वारे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) परदेशात असल्याने शऱद पवारांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट अनेकांच्या भूवय्या उंचावत आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं कारण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्य़ांमध्ये अर्धा तास पार पडलेल्या या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मराठा मंदिर कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शऱद पवार वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मराठा मंदिर संस्थेचा अमृत महोत्सव सोहळा शनिवारी 24 जून रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शदर पवार आहेत, याच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : लोकसभा नको रे बाबा! नेत्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर नवा पेच?
मुख्यमंत्री काय म्हणाले?
शऱद पवारांसोबत झालेल्या या बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुठलीही राजकीय चर्चा नाही, सदिच्छा भेट होती. मराठा मंदिर ही संस्था आहे, त्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शदर पवार असल्याने त्याचे निमंत्रण देण्यासाठी ते आले असल्याची माहिती मु्ख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान आता शरद पवार यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली आहे. मराठा मंदिर संस्थेचा अमृत महोत्सव सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी भेट घेतली.त्याचसोबत महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मनोरंजन माध्यमांतील संघटनांना घेऊन एका बैठकीचे आयोजन करावे यासंदर्भात चर्चा झाली,अशी माहिती शरद पवार यांनी ट्वीट करून दिली.
हे ही वाचा : नामांतरावरून असाही गोंधळ! एकाच दिवशी अहमदनगरला मिळाली चार नवी नावं!
ADVERTISEMENT