Nana Patole On Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये पहिल्यांदाच डीपीडीसीची मिटिंग घेतली. यावेळी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांना धारेधरव धरलं. अजितदादांनी म्हटलं की, गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. पुष्पगुच्छ, हार आणि विठ्ठलाची मूर्ती मला देऊ नका, तसं वागा, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, अजितदादा पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी कोणत्या लेव्हलला जातात हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. आज पुण्याची परिस्थिती बीडपेक्षा जास्त वाईट आहे. बीडमध्ये तर एकच वाल्मिक कराड पण पुण्यात अनेक वाल्किम कराड निर्माण करून ठेवले आहेत. बीडमध्ये काय फरक होईल, हे मला आता सांगता येणार नाही.
ADVERTISEMENT
नाना पटोले पुढे म्हणाले, "मी पुण्यावरून अंदाज बांधतोय. तिथे अवैध बार बांधण्यात आले आहेत. तिथे ड्रग्जचा मोठा धंदा सुरु करण्यात आलाय. एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये सर्व अवैध बार तोडावे लागले. दादा फार काळ पालकमंत्री म्हणून पुण्यात राहिले, तर पुण्याच्या विकासात किंवा वाल्मिक कराड निर्माण करण्यात किती यश त्यांना आलं, हे पुण्यावरून स्पष्ट होतंय. ते कोणाला इशारा करत होते ते त्यांनी स्पष्ट बोलावं. दादा तर स्पष्टवादी आहेत. संतोष देशमुखच्या आरोपीला तातडीनं जेलमध्ये का टाकलं नाही जात? कारवाई का केली जात नाही? संतोष देशमुखचे आरोपी अजूनही फरार आहेत. ते जमिनीच्या आत आहेत की जमिनीच्या वर आहेत, हे कळायलाच कारण नाहीय. दादांनी बीडला चांगलं करावं, एवढीच अपेक्षा.
हे ही वाचा >> Manoj Jarange: "आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोर...", मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा
"बारामतीत तिरछी चालच खेळली जाते. सरळ तर खेळली जात नाही. ती तिथे चिडले आहेत की राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर चिडले आहेत. हे कळायला कारण नाही. पण विधानसभेत त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेऊ. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचे (बोगस बिले) प्रकार झाले आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात असे प्रकार झाले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65 टक्के गुन्हेगार मंत्री आहेत. एका मंत्र्याने तर सांगितलं चार टक्के भ्रष्टाचार असतो, त्यांनी मान्य करून टाकलं. जेवढा निधी उपलब्ध केला, त्यातील चार टक्के यांना पाहिजेच. त्यामुळे बीडच्या डीपीडीसीमध्ये जे काही आरोप लावले आहेत, त्यात नावीन्य काही नाही. कारण हे सरकारच भ्रष्टाचारासाठी आणि मलाईदार जिल्हे, खाते आणि जनतेचे पैसे लुटण्यासाठी आले आहे", असंही नाना पटोले म्हणाले.
हे ही वाचा >> 'पेनड्राईव्ह दिल्यापासून 500 लोक कोमात गेलेत..', सुरेश धसांच्या 'त्या' पेनड्राईव्हमध्ये आहे तरी काय?
ADVERTISEMENT
