‘शिंदेंनी देवेंद्रजींशी तुलना करु नये…’, भाजपची खदखद अखेर आली बाहेर!

मुंबई तक

14 Jun 2023 (अपडेटेड: 14 Jun 2023, 01:13 PM)

सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये एका जाहिरातीवरुन बराच वाद सुरू आहे. ज्याबाबत आता भाजप नेते उघडपणे CM शिंदेंवर टीका करत आहेत. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काही सूचक विधानं केली आहेत.

controversy shiv sena bjp advertisement cm eknath shinde devendra fadnavis chandrashekhar bawankule politics of maharashtra

controversy shiv sena bjp advertisement cm eknath shinde devendra fadnavis chandrashekhar bawankule politics of maharashtra

follow google news

Politics of Maharashtra: मुंबई: मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) अधिक पसंती असल्याची एक जाहिरात काल (13 जून) मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, याच जाहिरातीमुळे भाजप (BJP) आणि शिवसेनेमधील (Shiv Sena) वाद हा थेट चव्हाट्यावर आला. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा होती की, या जाहिरातमुळे देवेंद्र फडणवीस हे व्यक्तीश: दुखावले गेले आहेत. मात्र, आता या सगळ्याबाबत भाजपची खदखद उघडपणे बाहेर पडली आहे. (controversy shiv sena bjp advertisement cm eknath shinde devendra fadnavis chandrashekhar bawankule politics of maharashtra)

हे वाचलं का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना थेट म्हटलं आहे की, ‘देवेंद्र फडणवीस यांची तुलना शिंदेंसोबत होता कामा नये. देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू असे नेते आहेत. असं थेट सुनावलं आहे.’F

पाहा चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय-काय म्हणाले:

‘काही प्रतिक्रिया येत असतात जेव्हा एखादी गोष्ट ही मनाविरुद्ध होते. काल जे थोडं त्या ठिकाणी जाहिरातीतून जे काही प्रकाशित झालं त्यातून काही कार्यकर्त्यांचं मन दुखावलं. कारण देवेंद्रजी हे पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून अष्टपैलू कामगिरी आहे.. या आधारावर त्यांनी या महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते घडवलं आहे. पक्ष वाढवला आहे. सरकार म्हणून काम केलं आहे. त्यामुळे थोडी ठेच मनाला लागली आहे.’

हे ही वाचा >> सुप्रिया सुळे भडकल्या! मोदींच्या मंत्र्याचा संसदेतच करणार ‘करेक्ट कार्यक्रम’

‘शिंदेजी उत्कृष्ट आहेत.. पण त्यांनी देवेंद्रजींशी जाहिरातीत स्वत:ची तुलना करणे.. हे ज्याने कोणी केलं असेल.. मला वाटतं एकनाथजी एवढ्या काय कोत्या वृत्तीचे नाहीत. मोठ्या विचाराचा, मोठ्या मनाचा माणूस आहे. एकनाथ शिंदेंना जे मी बघतो.. ते कधीही अशा लहान विचारात वागत नाही. पण ज्यांनी कोणी केली आहे जाहिरात त्याने देवेंद्रजींची शिंदेंसोबत तुलना करणं हे अचंबित करणारं होतं.’

‘मला वाटतं की, काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया स्वाभाविक असतील. आता हा विषय संपला आहे.’

‘एकनाथजी मोठ्या मनाचे आहेत. तसेच देवेंद्रजी देखील आहेत. मोठ्या ताकदीचे दोन्ही नेते महाराष्ट्राला मिळाले आहेत. अशावेळी अशा पद्धतीची जाहिरात करून महायुतीला वाद निर्माण करण्याचा ज्या कोणी प्रयत्न केला आहे त्यात आता मला जायचं नाही. पण असे विषय यापुढे होऊ नये असं मला वाटतं. त्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींशी बोललो आहे. यानंतर मात्र, कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही.’

हे ही वाचा >> लोकप्रियतेचा मुद्दा वगळला, देवेंद्र फडणवीस झळकले! शिवसेनेकडून ‘डॅमेज कंट्रोल’

‘भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. देवेंद्रजी हे सर्वोत्कृष्ट नेते आहेत. एकनाथजी-देवेंद्रजी हे लहान-भाऊ मोठा भाऊ यासारखे काम करत आहेत. अशा परिस्थिती ठिणगी टाकतंय… सरकारला अस्थिर करण्यासाठी काम करतंय.. जे यापुढे करू नये यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी एकनाथजी आणि देवेंद्रजी यांची भेट घेणार आहे.’

‘आजच्या जाहिरातीत शिंदेंच्या मंत्र्यांचे फोटो हे त्यांनी त्यांचा गट म्हणून छापला आहे. मी तर म्हणेन आज त्यांनी चांगल्या भावनेने.. जो आधी खोडसाळपणा झाला होता.. ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. हेच महाराष्ट्राला अपेक्षित आहे. हेच युतीला अपेक्षित आहे.’ असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर जरी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी यावेळी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद ही आता बाहेर येत आहे. त्यामुळे या सगळ्याचे पडसाद नेमके कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp