Samana Editorial : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होत आहे. त्याच बैठकीवर आज सामनाच्या अग्रलेखातून सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. मराठवाडा (Marathwada) मुक्ती संग्रामाच्या नावाखाली सरकारकडून मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर मारण्याचेच काम या बेकायदेशीर सरकारकडून केले जात असल्याचा घणाघात सामनातून करण्यात आला आहे. या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांसह त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यानाही बेकायदेशीर ठरवत या सरकारकडून केल्या जाणाऱ्या घोषणाही बेकायदेशीरपणे केल्या जात असल्याची टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे साऱ्या राज्याचेच लक्ष लागून राहिले असताना सामनातून मात्र 2016 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) असताना केलेल्या 50 हजार कोटीच्या घोषणांचे काय झाले असा सवाल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
कोट्यवधींची उधळपट्टी
राज्य सरकारकडून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे आणि बात मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर मारण्याचा प्रयत्न या शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून केला जात आहे अशी टीका सामनामधून केली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री येतील व झेंडा फडकवून निघून जातील. मराठवाडी जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावण्यात आल आहे.
हे ही वाचा >> Ganpati 2023: चाकमान्यानू बाप्पा पावले.. शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!
नाव अमृत महोत्सवाचे आणि…
राज्य मंत्रिमंडळाची आज मराठवाड्यात बैठक होत आहे. त्यानिमित्ताने सरकारकडून मराठवाड्यातील दुष्काळावर मदत मिळेल अशी आशा आहे. मात्र 2016 मध्येही देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांची खैरात केली होती. त्या घोषणांची यादीच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आली आहे. म्हणूनच सरकारवर टीका करताना सामनाच्या अग्रलेखातून या बैठकीला नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे आणि बाता मराठवाड्यातील दुष्काळावर फुंकर वगैरे मारण्याच्या असल्या तरी बैठकीचा सगळा थाटमाट राजेशाहीच आहे अशी खोचक टीकाही सरकारवर करण्यात आली आहे.
बाता फक्त मराठवाड्यातील
राज्यात एकीकडे महागाई आणि दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यातच राज्यात दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 685 शेतकरी मराठवाड्यातील आहे. तर बीड जिल्ह्यात किमान 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव काळातले हे चित्र राज्यासाठी विदारक असल्याचे म्हटले आहे.
राजेशाही थाटाचेच दर्शन
शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या नावाखाली संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मात्र ही बैठक ना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आहे ना लोकांच्या विकासासाठी आहे. या बैठकीतून शेतकऱ्यांच्या काही भले तर होणार नाहीच मात्र या बैठकीतून सरकारच्या राजेशाही थाटाचेच दर्शन मात्र होईल अशी टीकाही केली गेली आहे.
हे ही वाचा >> निवडणूक आयुक्तांचे अधिकारच काढून घेणार?, मोदी सरकारच्या मनात तरी काय?
दुष्काळ संपवण्याची भाषा
देवेंद्र फडणवीस 2016 मध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी 50 हजार कोटींच्या घोषणांची खैरात केली होती. त्या घोषणांची यादीच सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आली आहे. मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्याची भाषा करणाऱ्या आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी होणाऱ्या घोषणांची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल करण्यात आला आहे.
देव-देवतांचीही फसवणूक
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आली होती. ज्या प्रमाणे जनतेला फक्त घोषणा करुन दाखवल्या जातात, त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी देव-देवतांना पण त्यांनी सोडले नाही असा जोरदार टोला सामनातून देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
ADVERTISEMENT