Sharad Pawar : ‘मविआ बैठकी’त शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले कर्नाटकने…

मुंबई तक

14 May 2023 (अपडेटेड: 14 May 2023, 02:23 PM)

विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा एक भाग म्हणून आज कम्युनिस्ट पक्षाचे डी.राजा यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकने एक संदेश दिलाय. सर्व विरोधी पक्षाना एक रस्ता दाखवला असे सुचक विधान शरद पवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना केले.

d raja meet silver oak sharad pawar reaction on karnataka election

d raja meet silver oak sharad pawar reaction on karnataka election

follow google news

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. या निवडणूकीच्या जागा वाटपाबाबत पक्षाचे प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओकवरील महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी देखील पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुचक विधान केले.

हे वाचलं का?

विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा एक भाग म्हणून आज कम्युनिस्ट पक्षाचे डी.राजा यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाटकने एक संदेश दिलाय. सर्व विरोधी पक्षाना एक रस्ता दाखवला असे सुचक विधान शरद पवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना केले.

हे ही वाचा : बापाच्या अपमानाचा बदला! किशोर आवारेंच्या हत्येचं कारण समोर

कर्नाटक सारखी परिस्थिती इतर राज्यात निर्माण होण्यासाठी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. यामध्ये दोन पद्धतीची मेहनत आवश्यक आहेत. अनेक राज्यात सिंगल पक्ष आहेत. जशी कॉग्रेसने कर्नाटकमध्ये शक्ती दाखवली आणि भाजपविऱोधात जिंकले. तसेच इतर राज्यात किमान समान कार्यक्रम घेऊन जनतेत जाणार असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या बैठकीत काय झाले?

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. या निवडणूकीच्या जागा वाटपाबाबत पक्षाचे प्रमुख नेते लवकरच एकत्र बसून चर्चा करणार आहेत. राज्यातील इतर पक्ष, आघाडीतील घटक पक्षानाही बोलावून चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.आगामी निवडणूकीत महाविकास आघाडी सारखा एक ठाम पर्याय जनतेला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मुद्यावर बैठकीतील सर्व नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरून अगदी मोठ्या संख्येने ताकदीने काम करेल, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा : कर्नाटकचा निकाल लागताच केंद्राचा मोठा निर्णय, प्रवीण सूद CBIचे नवीन संचालक

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला. या निकालावर बैठकीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांची साधक बाधक चर्चा झाली. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना जी जबाबदारी दिली आहे.याबाबतीच पुढे कोणत्या गोष्टी होणार आहेत, याबाबत देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यात उन्हाळा प्रचंड असल्याने आम्ही वज्रमुठ सभा प्रलंबित ठेवल्या आहेत. जुनमध्ये पावसाला कमी झाल्यानंतर सभा घेण्याचा विचार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

    follow whatsapp