Eknath Shinde : "बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही घरगडी...", DCM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

DCM Eknath Shinde On Uddhav Thackeray : "खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी? काय मिळवलं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं?, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केलाय.

सेना विरुद्ध सेना: सर्वोच्च न्यायालयाने खरा गट ठरवण्यासाठी सभापतींच्या आधारावर प्रश्न उपस्थित केले

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे

मुंबई तक

19 Feb 2025 (अपडेटेड: 19 Feb 2025, 04:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

point

 "खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं, ते मुख्यमंत्री झाले नसते..."

point

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

DCM Eknath Shinde On Uddhav Thackeray : "खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी? काय मिळवलं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात...बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात..नोकर समजायला लागलात..मालक आणि नोकर बनून पक्ष मोठा होत नाही", असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीत राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली. त्या एका राज्य प्रमुखाला फोन गेला..बोलले कुठे चाललात? दिल्लीला चाललोय. ते म्हणाले शिंदे साहेबांनी राज्य प्रमुखांची बैठक बोलावली आहे. मालकासोबत राहाल की नोकरासोबत जाल? ते बोलले त्याला काय अर्थ आहे..मालक तर इथे बसला आहे. ते एकनाथ शिंदे तर नोकर आहेत. त्यांनी फोन कट केला आणि तिकडे येऊन त्यांनी भाषण केलं. त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं की अशा पक्षात कसा राहणार मी? शिंदे साहेबांसोबत शिवसेना वाढवण्यासाठी आजन्म मी काम करतोय".

हे ही वाचा >>  TATA Group ब्रीच कँडी रुग्णालयात करणार तब्बल 500 कोटी रुपयांची गुंतवणूक, नावही बदलणार?

रामदास कदमची आमदारकी कुणी काढली? रामदास कदमचं मंत्रिपद कुणी काढलं? मनोहर जोशींसारखे ज्येष्ठ नेते त्यांना लाखोंच्या जनसमुदायासमोर व्यासपीठावरून खाली उतरवलं. पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि वर्षाचे दरवाजे खुले झाले. मुंबईच्या मराठी माणसाला कळलं पाहिजे की एकनाथ शिंदेंनी उठाव का केला..ही वेळ का आली? शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून ज्या ज्या नेत्यांनी काम केलं, त्यांना सर्वांना बाजूला केलं. उद्धव ठाकरे पापाची फळं भोगतायत, अजून भोगा.., असं म्हणत शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. 

हे ही वाचा >> Chhaava Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची हवा कायम... 200 कोटींचा आकडा पार, अनेक रेकॉर्ड मोडले

"कुणाचे खोके आणि काय खोके...आता सगळं कशाला खोके खोके..तुम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेने या खोक्यात बंद करून टाकलं. रस्सी जळाली पण पिळ जात नाही. त्यावेळी म्हणायचे कोण एकनाथ शिंदे? आम्ही दाखवलं आम्ही कोण आहेत ते...आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे न्याय देणारे लोक आहोत. दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका", असंही एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले होते. 

    follow whatsapp