Eknath Shinde On Uddhav Thackeray : "जो माणूस पराभूत झालाय, तो काहीतरी त्रास देतोय, पण गाठ या एकनाथ शिंदेंशी आहे. माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या कष्टकऱ्यांना आणि मतदारांना त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तर गाठ माझ्याशी आहे. कारण मी जे बोलते ते करून दाखवतो. मी एकदा कमिटमेंट केली तर स्वत:चंही ऐकत नाही. 2022 ला आपण या राज्यात मोठा उठाव केला. मोठी क्रांती घडली. फक्त देशातही नाही तर जगातील 30-40 देशांनी त्याची नोंद घेतली. सत्तेतून आम्ही पायउतार झालो. लोक सत्तेकडे जातात. मी मंत्री होतो, माझ्यासोबत अनेक मंत्री होते. सत्तेतून आम्ही पायउतार झालो. कारण बाळासाहेबांच्या शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम काही लोक करत होते. 2019 ला शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम केलं. हिंदूत्वाचे विचार सोडले आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं. धनुष्यबाण हा गहाण पडला आणि तो वाचवण्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदेंने उठाव केला आणि तुमच्या मनातील सरकार या एकनाथ शिंदेने आणलं"", असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते जालन्यात शिवसेनेच्या आभार सभेत बोलत होते.
ADVERTISEMENT
जालन्यात शिवसैनिकांना संबोधित करताना शिंदे पुढे म्हणाले, या मैदानात बाळासाहेबांची सभाही झाली होती. अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांची सभा झाली आणि आता तुमचा सर्व सामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेची होतेय. मी तेव्हा शब्द दिला होता की, तुम्ही महायुतीला या जालन्यातील आमदार निवडून द्या. महायुतीचे पाचच्या पाच आमदार निवडून आले. निवडूक झाल्यानंतर विजयोत्सवाचा गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल, म्हणून मी याठिकाणी आपले आभार मानायला आलो आहे. आज मी तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला आलोय.
हे ही वाचा >> Navnath Waghmare : "जरांगेला अटक करा, अनेक जणांकडे रिव्हॉल्वर...", OBC नेते नवनाथ वाघमारेंनी सगळंच सांगितलं
लोकसभेनंतर विधानसभेत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला. तो विजय आज आपण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करूया. मी दिलेला शब्द पाळणार आहे. एकदा शब्द दिला की, मग पुन्हा मागे फिरणार नाही. ही शिकवण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आहे. शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका. या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले, ते शब्द पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा >>Ranji Trophy 2025: अरेरे... रोहित, रहाणे, अय्यर सपशेल फेल, जम्मू-काश्मीरने मुंबईला चारली धूळ
ADVERTISEMENT
