देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळात 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून, भाजपने गृह, महसूल, पाटबंधारे आणि शिक्षण ही खाती स्वतःकडे ठेवली आहेत. मंत्र्यांचा कार्यकाळ केवळ फक्त अडीच वर्षांचा राहणार अशी माहितीही आता समोर आली आहे. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रणनीती सांगितली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या मंत्रिमंडळात 6 मंत्री राज्यमंत्री आहेत आणि येत्या दोन मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल. मंत्रिपदांच्या वाटपाबाबत एकमत झालं असून, ते अंतिम टप्प्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हे ही वाचा >> Zakir Hussain Passes Away in US : कला विश्वावतला सूर्य मावळला, झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आगामी विधानसभेच्या अधिवेशनात 20 विधेयकं मांडण्यात येणार असून, ही विधेयकं राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.
काय म्हणाले शिंदे- फडणवीस?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांच्या रोटेशनल फॉर्म्युल्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, ते म्हणाले त्यांनी मंत्र्यांच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळाबद्दलही सूचक विधान केलं आहे. "एकतर काम करा किंवा राजीनामा द्या..." हा नियम लागू केला जाईल. याअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. या नियमामुळे अधिकाधिक आमदारांना कामगिरी करण्याची संधी मिळणार असून, त्यातून ते आपली क्षमता सिद्ध करून पक्षात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असंही शिंदे म्हणाले. तर परफॉर्मन्सच्या आधारावरच आपणही निर्णय घेणार असल्याचा फडणवीसांचाही सूर दिसला.
ADVERTISEMENT