मोठी बातमी... देवेंद्र फडणवीसांनी यादी आधीच जाहीर केलं नागपूरच्या उमेदवाराचं नाव

योगेश पांडे

• 01:45 PM • 08 Mar 2024

Devendra Fadnavis Nagpur: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्याची ऑफर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा उमेदवार कोण असणार हेच जाहीर करून टाकलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

follow google news

Devendra Fadnavis Nagpur Candidate: नागपूर: भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपली पहिली यादी जाहीर केली. ज्यामध्ये 195 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत भाजपमधील दिग्गज आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. ज्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील उमेदवारांचं नावच जाहीर केलं आहे.

हे वाचलं का?

त्याचं झालं असं की, भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव नसल्याने शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सातत्याने भाजपवर टीका केली आहे. काल (7 मार्च) उमरगा इथे बोलत असताना नितीन गडकरींना थेट महाविकास आघाडीतून लढण्याची ऑफर दिली.

हे ही वाचा>> 'BJP ने आमचा केसाने गळा..', रामदास कदमांचा उघडउघड हल्ला

दरम्यान याच मुद्द्यावरुन नागपूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंवर टीका केली. मात्र, त्यानंतर नागपूरमधून कोण उमेदवार असणार हेही सांगितलं. 'गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत.महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल. ते (गडकरी) महाराष्ट्रातून, नागपूरमधून लढतील.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.

'ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय', देवेंद्र फडणवीस गडकरींच्या उमेदवारीवर नेमकं काय म्हणाले?

ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतील व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे. खरं म्हणजे गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत. महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल. ते महाराष्ट्रातून, नागपूरमधून लढतील. 

 

ज्यावेळेस पहिली यादी जाहीर झाली त्यावेळेस महाराष्ट्रात आमची जी महायुती त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रातील जागांवर आम्ही चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर निर्णय होईल त्यावेळेस सगळ्यात पहिले नितीनजींचं नाव येईल.

'मला असं वाटतं की, हे जे काही स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायेत त्यामुळे त्यांचं हसं होतंय. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

'महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवा..' नितीन गडकरींनी ठाकरेंना खुली ऑफर देताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

'भाजपने 195 जणांची यादी जाहीर केली होती. यात नरेंद्र मोदी, अमित शाहांच नावं आहे. या यादीत कृपाशंकरचंही नाव आहे...कोण आहे माहितीय? काँग्रेसमधून यांच्या उरावरती आलेला. यांच्याच विरोधात बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी भाजप बोबंलली होती. आता त्याच नेत्याचे नाव नरेंद्र मोदींसोबत आहे.'

हे ही वाचा>> 'आम्ही 115 तरी तुम्हाला..', फडणवीसांनी एका वाक्यात..

'पण ज्यानी भाजप रूजवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर युतीमध्ये मेहनत घेतली, त्या नितीन गडकरींचे नाव या यादीत नाही. नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे महाविकास आघाडीतून, आम्ही तुम्हाला निवडून आणतो.. यांना महाराष्ट्राच पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा, महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, द्या राजीनामा...आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो.' अशी ऑफरच ठाकरेंनी गडकरींना दिली आहे. 

    follow whatsapp