Devendra Fadnavis: ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची.. ‘सामना’तून फडणवीसांना घायाळ करणारी टीका

Saamana Editorial: शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांचा अंहकार वाढला असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली आहे.

devendra fadnavis arrogance has increased since he became the deputy chief minister criticized in the saamana editorial

devendra fadnavis arrogance has increased since he became the deputy chief minister criticized in the saamana editorial

रोहित गोळे

19 Aug 2023 (अपडेटेड: 19 Aug 2023, 04:08 AM)

follow google news

Saamana Editorial on Devendra Fadnavis: मुंबई:‘देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय.’ अशा अत्यंत बोचऱ्या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. (devendra fadnavis arrogance has increased since he became the deputy chief minister criticized in the saamana editorial maharashtra political news in marathi)

हे वाचलं का?

मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं आणि मी पुन्हा आलो होतो.. पण काही जणांनी बेईमानी केली. असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून शिवसेना ठाकरे गटाने आता फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवत फडणवीसांना अक्षरश: घायाळ केलं आहे.

    follow whatsapp