महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला असून, या निकालापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाकित केलं. फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादाचा हवाला देत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री कसे होऊ शकत नाही, यावर स्पष्ट भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
मुंबई Tak बैठकमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “2019 नंतरच्या अंदाज व्यक्त करणं माध्यमांनी सोडून दिलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वी सध्या प्लान ए,बी, सी ची चर्चा होताहेत. त्यावर फडणवीस म्हणाले, “ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी बघितली, त्यांच्या हे लक्षात आलं असेल, की उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं सरकार परत येऊ शकत नाही. मी वकील आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांनी दिलेल्या राजीनामा रद्द करून त्यांना परत कसं आणून बसवणार नाही. कोर्टातील काम बघितलं, तर त्यांची मागणी तिचं होती.”
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील -देवेंद्र फडणवीस
“सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल अंदाज लावणे चुकीचं आहे. आमच्या भूमिकेमुळे आम्हाला असं वाटतं की, तो योग्य पद्धतीने येईल. मी आज माझं भाकित सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोरं जाऊ. हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
हेही वाचा >> शेतकरी कर्जमाफीवर एकच पर्याय, तो म्हणजे…; देवेंद्र फडणवीस सांगितला उपाय
सुप्रीम कोर्टाने राज्यपालांबद्दल केलेल्या टिप्पणीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर वेगवेगळी विधान नेत्यांकडून सुरू झाली. राजकीय घटनाक्रम बघितल्यानंतर शंका व्यक्त होत आहेत. त्यावर फडणवीस म्हणाले, “अर्ध बघायचं हे पत्रकारांचं कामच आहे. त्यामुळे मी तुम्हाला दोष देणार नाही. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात बदल होतात. ते नवीन नाही. बिहारमध्ये आपण बघितलं की, नितीशजी आम्ही सोबत आलो. पण, ते दूर जातील असं वाटलं नव्हतं.”
शरद पवारांची भूमिका बदललेली नाही; फडणवीसांनी मांडली भूमिका
“आपण महाराष्ट्रात बघितलं तर राजकारण स्थिर आहे. शरद पवारांनी भूमिका बदललेली नाही. त्यांनी आमच्या सांगण्यावरून बोलले नाहीत. त्यांनी खरं म्हणजे देशात विरोधकांना एक करण्याचं काम शरद पवार करताहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, बिटवीन द लाईन जास्त वाचता आहात.”
ADVERTISEMENT