Ravindra Chavan: ठरलं... फडणवीसांचे निकटवर्तीय भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी

Ravindra Chavan Maharashtra BJP state president: भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने अखेर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. ज्याबाबत आज (11 जानेवारी) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी

रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी

मुंबई तक

• 09:56 PM • 11 Jan 2025

follow google news

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रवींद्र चव्हाणांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ने रवींद्र चव्हाण यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. त्यामुळेच रवींद्र चव्हाणांवर ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर आणि मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप झाल्यानंतर भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल असं सांगण्यात येत होतं अखेर आज (11 जानेवारी) त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

हे ही वाचा>> Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी 2019 ला ब्लंडर मिस्टेक केली...", चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना दिलं रोखठोक उत्तर

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट नाकारलं होतं. ज्याचा फटका त्यांना विदर्भात बसला होता. तसंच राज्यतील सत्ता समीकरण बदलल्यानंतर विदर्भातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष पद बहाल करण्यात आलं होतं. अखेर त्यांच्या नेतृत्वात भाजपने 2024 विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे बावनकुळेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या जागी नेमकी कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असातनाच रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे आलं. ज्यावर आता पक्षानेही मोहोर उठवली आहे.

चांगल्या कामगिरीमुळे मोठी जबाबदारी

रवींद्र चव्हाण यांची संघटनेत आतापर्यंतची कामगिरीही दमदार राहिली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, भाजपचे वरिष्ठ नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

हे ही वाचा>> Sanjay Raut: "आम्ही स्वबळावर..काय होईल ते होईल...", संजय राऊतांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार

जेव्हा रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले नव्हते, तेव्हा पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली होती. यावर चव्हाण म्हणालेले की, 'भाजप ही आमची खरी ओळख आहे आणि मंत्रिपदापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे. त्यामुळे मला मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे की नाही हे महत्त्वाचे नाही. भाजपला आणखी बळकटी देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन.'

नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही, रवींद्र चव्हाण विधानभवन संकुल आणि भाजप विधिमंडळ कार्यालयात अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण संवाद साधताना दिसत होते. तसेच मागील काही दिवसांपासून ते राज्यभरातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचंही पाहायला मिळालं होतं. 

    follow whatsapp