केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात जाहीर सभा सुरु आहेत. या जाहीर सभेत आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या बेईमानीचा किस्सा सांगितला. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. (devendra fadnavis criticize udhhav thackeray sharad pawar chadrapur meeting modi 9 years government)
ADVERTISEMENT
राहुल गांधींच्या लग्नाचा ठराव
चंद्रपूरात भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षातील कामामुळे देशभरातील सर्व परीवारवादी पार्ट्यांना दुकान बंद होण्याची भीती वाटली, आणि या भीतीनेच सर्व परीवारवादी पार्ट्यां पाटण्यात एकत्र आल्या अशी टीका फडणवीस यांनी केली.तसेच विरोधकांचा एक्य घडवण्याचे काम मोदींनी केल्याचेही त्यांनी सांगितले. ”पाटण्यात मोदी हटाओ नव्हे तर परीवार बचाव कार्यक्रम होता”, तिकडे सर्व जमलेल्यांना देशाची नव्हे तर परीवाराची चिंता असल्याचा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.
हे ही वाचा : ”नातवाने शेण खाल्ले तरी…”, संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं
विरोधकांच्या बैठकीत एकच ठराव पास केला. राहुल गांधींसाठी मुलगी शोधायची आहे आणि त्यांचे लग्न करून द्यायचे आहे. याकरीता सर्व एकत्र आले आहेत, अशी खिल्ली देखील फडणवीसांनी विरोधकांच्या बैठकीची उडवली. हे सर्व काजवे एकत्रित येऊन, नरेंद्र मोदी रूपी सुर्याला बदलण्याचा विचार करतायत, पण सुर्याकडे तोंड करून थुंकालं, तर थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते, अशी टीका देखील फडणवीसांनी केली.
”उद्धवजी तुमको मिर्ची लगी तो मे क्या करू”
परीवारवादी वार्टी म्हटलं तर उद्धव ठाकरेंना फारच झोंबलं. ”उद्धव जी तुमको मिर्ची लगी तो मे क्या करू”. उद्धव ठाकरे आधी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर गेले, त्यानंतर माझ्या पत्नीवर आले. ”मे कॉंच के घर नही रहता”, ”तुम कॉंचं के घर मे रेहते हो”,”और कॉंच के घर मे रहनेवाले दुसरे घर पर पत्थर फेका नही करते”, असा इशाराच त्यांनी ठाकरेंना दिला. आमचं जीवण खुली किताब आहे, तुमच्याकडे जे काही असेल तर उघडून दाखवा, माझं खुलं आव्हान आहे, असे थेट आव्हान ठाकरेंना दिले.पण लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पडला तर सोडत नाही, त्यामुळे ज्याच्या अलमारीमध्ये सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणण्याचे कारण नाही. सांगाडे बाहेर निघतील,जरूरू निकलेंगे, बाहेर निकाल कर रहेंगे, असे थेट इशाराच दिला.
हे ही वाचा : NCP : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने थेट 10 कारणंच सांगितली
शरद पवारांचा ‘तो’ किस्सा
सेनेवाल्यांसह राष्ट्रवादीही म्हणाली एकनाथ शिंदेंनी बेईमानी केली. हे विसरले 1978 साली शरद पवार वसंत दादांच्या मंत्रिमंडळातले 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि तेव्हाच्या भाजपसोबत सरकार स्थापण केले. म्हणजे तेव्हा पवार साहेबांनी केलं तर मुत्सदेगिरी आणि शिंदेंनी केली तर बेईमानी, हा कुठला न्याय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT