योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis On Narayan Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे गटात तुफान राडा झाल्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. या राड्यादरम्यान भाजप आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांसमोर खळबळजनक वक्तव्य केलं.
"साहेब, यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांवरुद्ध असहकार्य असेल. आणि त्यांना येऊ दे.. तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो.. अरे ठेचून एक-एकाला रात्रभर मारुन टाकेन... सोडणार नाही", अशी धमकी राणेंनी विरोधकांना दिली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे. नारायण राणे यांची बोलण्याची एक पद्धत आहे ते बोलताना आक्रमक आहेत पण कुणाला धमक्या देतील ते असं मला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले. (After the fall of Chhatrapati Shivaji Maharaj's statue, Mahavikas Aghadi leaders have become very aggressive and are attacking the rulers. The political atmosphere has heated up due to the clash between Thackeray and Rane factions at Rajkot fort)
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
राजकोट येथील घटनेवर कोणीही राजकारणात करू नये. सर्वांसाठी कमीपणा आणणारी घटना आहे. घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करू. नेव्हीने सुद्धा चौकशी समिती तयार केली. टीम तयार केली आहे. नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करेल. या घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती, काय चुका राहिल्या या संदर्भातला रिपोर्ट त्या ठिकाणी असेल.
हे ही वाचा >> Rane vs Thackeray : राणे-ठाकरे गटात कशामुळे झाला राडा? राजकोट किल्ल्यावरील INSIDE स्टोरी, पाहा VIDEO
सार्वजनिक बांधकाम विभागाने एक पोलीस तक्रार एफआयआर केलेली आहे. पोलीस विभाग कारवाई करेल सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितल आहे की, आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहोत.
घटना झाल्यानंतर जे जे करण आवश्यक आहे ते केलं जात आहे. नेव्हीकडून सुद्धा करण्यात येत आहे, मात्र त्याचवेळी केवळ आणि केवळ याच राजकारण करायचं. हे जे काही विरोधकांनी सुरू केलेले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या, निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायचं हे अत्यंत चुकीच आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण त्यांनी करू नये.
हे ही वाचा >>Uddhav Thackeray: "येत्या रविवारी...", राजकोट किल्ल्यावर राडा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला 'हा' इशारा
मी एवढेच सांगतो राज्य सरकार, नेव्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुका पुन्हा घडणार नाही. ज्याने चुका केल्या त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी उभा राहील. या संदर्भातली कारवाई सुरू केली आहे. कोणी काय केलं, हे मी बोलणार नाही पण सगळ्यांनाच विनंती आहे, या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांना हे देखील माहिती आहे की, हा पुतळा नेव्हीने तयार केलेला आहे. हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. विरोधकांच्याकडून हे राजकीय वक्तव्य केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे,
ADVERTISEMENT