Lok Sabha : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?

भागवत हिरेकर

• 05:37 AM • 26 Nov 2023

Lok Sabha Election 2024 Seats sharing formula in maharashtra : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. भाजप सर्वाधिक म्हणजे २६ जागा लढवणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि अजित पवार गटाला तडजोड करावी लागणार असंच सध्या दिसतंय.

What is Mahayuti (bjp, Shinde Shiv Sena and NCP Ajit Pawar) seat sharing formula for lok sabha election?

What is Mahayuti (bjp, Shinde Shiv Sena and NCP Ajit Pawar) seat sharing formula for lok sabha election?

follow google news

Devendra Fadnavis On Lok Sabha Seat Sharing in Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी) जागा वाटप कसं करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल अजून फॉर्म्युला ठरलेला नाही. दुसरी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार गट किती जागांवर लढणार, हे समोर आलं आहे. (Devendra Fadnavis Revealed BJP, Shiv Sena, NCP Ajit Pawar Seat Sharing Formula for lok Sabha Election)

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला.

लोकसभा निवडणूक जागा वाटप : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “लोकसभा 2024 निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार, तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट संयुक्तपणे 22 जागांवर लढेल.”

MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?

जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत अनौपचारिक बैठक झाली. विद्यमान खासदारांचे नामांकन आणि इलेक्टिव्ह मेरिट हे उमेदवार निवडीचे मुख्य सूत्र असेल, असं या बैठकीत ठरलं.”

“ठाकरेंचा शिंदेंबद्दलचा ‘तो’ ठराव बनावट”, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला महत्त्वाचं वळण

“आम्ही महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे आणि आमच्याकडे विजयी होऊ शकणाऱ्या उमेदवारांची प्राथमिक माहिती आहे. यात मुद्दा आहे तो 2019 मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा, तर त्यांना पुन्हा उमेदवारी देणे ही परंपराच राहिली आहे”, असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकसभा 2019 मध्ये कुणी किती लढवल्या होत्या जागा?

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “निश्चितपणे, हा अंतिम शब्द नाही आणि जागा वाटपाबद्दल अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा आणि वाटाघाटी केल्या जातील.” 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढले होते. त्यावेळी 48 पैकी 25 जागा भाजपने लढवल्या होत्या, तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार दिले होते. यापैकी भाजपने 23 जागा जिंकल्या, तर शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 22 जागा आल्या होत्या, त्यापैकी दोन जागा मित्र पक्षासाठी सोडाव्या लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार निवडून आले होते.

    follow whatsapp