Dhananjay Munde big Statement On Shasan Aplya Dari Program : बीड जिल्ह्यात पंकजा ताईंनी विकासाची सुरुवात केली. आता आपण विकासाच्या मध्यावर आहोत. आणि आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीने इतकचं सांगेन की, पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करू, असे मोठे विधान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. या त्यांच्या विधानाची एकच चर्चा रंगली आहे. (dhananjay munde big statement on shasan apala dari beed parli pankaja munde devendra fadnavis)
ADVERTISEMENT
बीडच्या परळीत आज महायुती सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी एक इच्छा व्यक्त केली.
हे ही वाचा : Nalasopara Crime : बंद खोली, कुजलेला मृतदेह अन्…, अल्पवयीन मुलीची हत्या कुणी केली?
पंकजा ताईंनी विकासाची सूरूवात केली, आता विकासाचा मध्यावर आपण आहोत. आणि आज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीने इतकचं सांगतो की, आम्ही (मी आणि पंकजा) दोघं मिळून बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू, माझी इतकी इच्छा असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
जीवनात अनेक सभा केल्या, अनेक कार्यक्रम केली, पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातल्या ३६ हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानेल आहेत. या तिघांमुळे बीडच्या इतिहासात इतका निधी कधीच आला नाही. 1400 कोटीच्यी निधीचे विकासकामाच्या रूपात भूमिपूजन केले. बीड जिल्ह्याला 1400 कोटी दिले त्याबद्दल मी आभार मानतो, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Dinesh Phadnis: CID फेम अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; चाहत्यांना मोठा धक्का!
तीन राज्यात भाजपचं सरकार आलं. त्या राज्यातील काही योजना आहेत.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. लाडली बहणा सारख्या योजना अंमलात आणा.मग आपल्याला लोकांची दारी जाण्याची वेळ येणार नाही. लोक आपल्या दारी येतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. मला खुप उकाडा होत होता, मग शिंदे पवार फडणवीस एका मंचावर आले आहेत, त्याहीपेक्षा पारा जास्त गरमीने वाढलाय जेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT