'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली', सुरेश धसांनी उडवून दिली खळबळ

धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाली होती. जिथे त्यांनी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली'

'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली'

मुंबई तक

• 11:14 PM • 06 Jan 2025

follow google news

मुंबई: सातपुडा या शासकीय बंगल्यावर धनंजय मुंडेंनीच अवादा कंपनीकडे 3 कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीची डील 3 कोटींवरून 2 कोटींवर झाली. असा गंभीर आणि खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला आहे. (dhananjay munde demanded a ransom of 3 crores bjp mla suresh dhas created a stir)

हे वाचलं का?

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी थेट विधानसभेत आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांनी सुरुवातीला वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आज त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना थेट धनंजय मुंडेंवरच खंडणीचे खळबळजनक आरोप केला आहेत. पाहा सुरेश धस नेमकं काय म्हणाले

'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, 3 कोटींची खंडणी मागितलेली..', धसांचा गंभीर आरोप 

'सातपुडा या शासकीय बंगल्यावर बैठक झाली. इथे अफताब तांबोळी, शर्मा, नितीन बिक्कड, वाल्मिक आण्णा आणि धनंजय मुंडे हे होते. धनंजय मुंडे होते त्यांनी 3 सांगितले.'

हे ही वाचा>> Ajit Pawar: 'तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात...' अजितदादा 'हे' काय बोलून गेले?

'सातपुड्याला काय ते संत तुकारामांच्या ग्रंथाचं विमोचन करायला आले होते का? की ज्ञानेश्वरीचं प्रकाशन होतं का? धनंजय मुंडे तिथे होते त्यांनी 3 सांगितले.. कर्मचारी बाहेर गेला त्याने फोन केला.. समोरून सांगितलं 3 कोटी नाही देणार.. त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना आणि हे सीडीआरमध्ये येईल ना.' 

'हे बघा.. गृहखात्याला काही तपासायचं असेल तर ते तपासतील. कोण काय बोललंय हे सगळं येईल. 3 कोटी मागितलेले आणि त्याची 2 कोटीवर डील ठरली, डील ठरल्यावर सगळी मंडळी तिथून निघून गेली.' 

'मी जी 19 तारीख म्हणतो जूनची.. त्याचे सगळे सीडीआर सापडतील ना.. धनंजय मुंडे वैगरे यांचे मोबाइल तिथेच होते. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. वाल्मिक आण्णाचीच बैठक असती तर ओबेरॉय, ट्रायडेंटवर झाली असती.'

हे ही वाचा>> धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार आणि CM फडणवीसांची ‘सागर’वर खलबतं

'थेट खंडणीचा आरोप नाही.. मी जबाबदारीने बोलतो.. मला ही माहिती आता मिळाली नुकतीच.. आगे देखो होता है क्या..' 

'मला तर असं कळलंय की कोणाचा तरी पीए हा सीसीटीव्हीमध्ये अडकला आहे. अवादा कंपनीकडून घेताना.. अशी माहिती मिळाली आहे. या घटनेशी संबंधित कोणाचा तरी पीए. जोशी पीए.. भरपूर पीए आहे त्यांचा त्यातील एक पीए.' 

'अजितदादा धनंजय मुंडेंना पाठिशी घालत आहेत..'

'आका वाल्मिक कराड.. विष्णु चाटे हा प्यादं आहे. आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे..' 

'अजितदादा हे त्यांना पूर्णपणे पाठिशी घालत आहेत? कशाला पाठिशी घालत आहेत? दादा राजीनामा घेतील असं मला वाटत नाही. तो त्यांनी घ्यावा की नाही तो त्यांचा प्रश्न. प्रामाणिक मागणी आहे की, राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे आणि तो त्यांनी दिला पाहिजे.' असंही सुरेश धस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp