बीड: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. त्यातच आता थेट धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्यात यावं यासाठी हायकोर्टातच याचिका दाखल करण्यात आली आहे. (beed remove dhananjay munde from the ministerial post sarpanch santosh deshmukh brother files a petition directly in the mumbai high court)
ADVERTISEMENT
मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी हायकोर्टाकडे ही मागणी केली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, दाखल केलेल्या या याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे हे आपण सविस्तरपणे पाहूया.
हे ही वाचा>>Maharashtra News Live Updates : CID ने फासे टाकले, वाल्मिक कराड अडकणार का? संतोष देशमुख प्रकरणात अपडेट्स
हायकोर्टात दाखल केलेली याचिका जशीच्या तशी...
मस्साजोग सरपंच श्री. संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयात क्रिमिनल रेट याचिका दाखल.
माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे मयत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ येथे वकील शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्याद्वारे पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला डायरेक्शन देण्याबाबत क्रिमिनल रिट पिटीशन ( Cr.WP) दाखल करण्यात आलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यातील या खळबळजनक अपहरण व हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सदरील याचिकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील एकंदरीत गुन्हेगारी नेटवर्क यांची सर्व पाळेमुळे त्याचे राजकीय लागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप व संघटित गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा यांच्या बद्दल ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव गृह मंत्रालय (राज्य शासन) व पोलीस प्रमुख यांना द्यावे अशा मागण्यां या क्रिमिनल रेट याचिकेच्या माध्यमातून केलेली आहे.
हे ही वाचा>> Sandhya Sonawane Beed : बीडमध्ये CID कडून 9 तास चौकशी झाली, त्या संध्या सोनवणे नेमक्या कोण? का होतेय त्यांची चौकशी?
सदरी क्रिमिनल रेट याचिके मध्ये अंतर्भूत प्रमुख स्वरूपाच्या मागण्या खालील प्रमाणे खालील प्रमाणे :-
१. मयत सरपंच यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून क्रूर हत्या झाल्यानंतर देखील आजपर्यंत सर्वच्या सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही ही गंभीर बाब आहे याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश पारित करावा.
२. या एकंदरीत घटनेचा मास्टरमाइंड ज्याचे नाव पुरवणी जवाबमध्ये कंप्लेंट यांनी दिलेले आहे व ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो मास्टरमाईंड म्हणजे वाल्मीक बाबुराव कराड याच्या अटके संदर्भात योग्य तो तपास पावले उचलत या वाल्मीक बाबुराव कराड आरोपीवर १. Mocca कायदा (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा -१९९९) अंतर्गत कलम: कलम 3(1) नुसार, संघटित गुन्हेगारी अन्वये बुक करावे.
तसेच, श्री. वाल्मीक बाबुराव कराड यांच्यावर हत्या (जुन्या भारतीय दंड संहिता कायद्यान्वये ऊपरोकीत सेक्शन : ३०२ (फॉर मर्डर) , किडनॅपिंग: ३५९ व ३६३, क्रिमिनल कन्स्पायरसी १२०-B)
नविन सेक्शनस:- भारतीय न्याय संहिता २०२४ अन्वये : १०३ (फॉर मर्डर) , किडनॅपिंग :१३७ , क्रिमिनल कन्स्पायरसी : 120B. (फक्त आपल्या संदर्भासाठी नवीन व जुनी सेक्शन वेगवेगळे पाठवत आहोत). त्या अन्वये वाल्मीक बाबुराव कराड यांच्यावर एफ.आय.आर. तात्काळ वरील कलमाअन्वये बुक करत दाखल करावे व पुढील तपास करावा.
३. तसेच, बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्वाला मिळणारी उत्स्फूर्त राजकीय रसद (राजआश्रय ), मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र शासनातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर तात्काळ हटवत वरील संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा त्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये याबाबत प्रमुख प्रेयर मागण्या स्वरूपात याची की मध्ये उल्लेख केलेला आहे.
वाल्मीक बाबुराव कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील असणारे निकटचे संबंध याचिकाकर्त्यांनी कराड व धनंजय मुंडे यांचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट त्यामधील हजारो फोटो यापूर्वीचे त्यांचे व्यावसायिक भागीदारी संबंधित दस्तऐवज, यांचे एकत्रित असलेले अनेक व्हिडिओ, त्यांच्या संदर्भात एकत्रित केलेले भाषणे व भाष्य तसेच मुख्यतः महाराष्ट्र विधानसभेतील केल्या गेलेल्या भाषणाचा संदर्भ देत विधानसभेतील भाषण भाजप (आमदार सुरेश आण्णा धस, आमदार संदीप क्षीरसागर, स्थानिक केज आमदार नमिता मुंदडा व आमदार जितेंद्र आव्हाड) यांच्या सखोल भाषणाचा (आमदारांची नावे वगळता) याचिकेमध्ये संदर्भ देत, त्या अनुषंगाने विधानसभेतील भाषणे हे एक पब्लिक डॉक्युमेंट असते त्याचा दाखला घेत;
वरील उल्लेखित व्यक्तींचे ( वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे) त्यांचे एकमेकांना होणारे सहकार्य याबद्दल उल्लेख करत सदर गोष्टींचा पुरावा म्हणून अवलोकन करत न्यायालयाने योग्य तो आदेश पारित करावा.
मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे निकटवर्ती वाल्मीक बाबुराव कराड यांचे भूतकाळातील निकटवर्तीपणा, सहचर्य व लागेबांधे यांचा सखोल तपास करून याप्रकरणी तपास यंत्रणेने योग्य तो अहवाल सादर करावा.
४. मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक बाबुराव कराड यांचे सहकार्य पाहता सदरील अपहरण व हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही याबद्दल पावले उचलत राज्य शासनाला, त्यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे राज्य सरकारमधील मंत्रीपद तूर्तास काढून घेत सदरील घटनेचा तपास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून कायम दूर ठेवण्याबाबतचा आदेश माननीय उच्च न्यायालयाने पारित करावा अशी मुख्य मागणी याचिकाकर्त्याने माननीय उच्च न्यायालयात दाखल क्रिमिनल रिट याचिका दाखल करत ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्या माध्यमातून केलेली आहे.
ADVERTISEMENT
