Dharma Mane Markadwadi : धर्मा माने मारकडवाडीमध्ये, राम सातपुते यांच्याबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

10 Dec 2024 (अपडेटेड: 10 Dec 2024, 02:04 PM)

धर्मा माने हे लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या प्रचारादरम्यानच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतील व्हिडीओमुळे राज्यभरातील लोकांना माहिती झाले होते.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मारकडवाडीमध्ये भाजपची सभा

point

फेक नरेटीव्हचा आरोप, सभेतून देणार उत्तर

Ram Satpute Sabha Markadwadi : सोलापूरमधील माळशिरसमध्ये असणाऱ्या मारकडवाडी गावात काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सभा घेतली होती. EVM वरील मतदानावर आक्षेप घेत या गावातील लोकांनी बॅलेटवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवार यांनी या गावातील सभेतून देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत तुम्ही या गावात येऊन लोकांचं म्हणणं ऐकून घ्या असं म्हटलं आहे. त्यानंतर भाजपने आता फेक नरेटीव्ह तयार केल्या जात असल्याचा आरोप करत आज त्याच मारकडवाडी गावात ही सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी तालुक्यातील सगळेच भाजप नेते, पदाधिकारी जमले असून, यामध्ये लोकभेला चर्चेत आलेले धर्मा मानेही उपस्थित आहेत. यावेळी धर्मा माने यांनी तालुक्यातली स्थिती सध्या  बाहुबली सारखी झाली आहे असं म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Waqf Board : "वक्फ बोर्डाचा देशातील 994 मालमत्तांवर बेकायदेशीर...", संसदेत दिलेल्या उत्तरातून आकडेवाडीर समोर

मरकडवाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून EVM वर संशय व्यक्त करत, बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करत एक लढा उभारण्यात आल्याचं दिसलं. आम्ही उत्तमराव जानकर यांना मतं दिली, मग आमच्या गावातून लीड कसं मिळालं नाही? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर आज होणाऱ्या या सभेतून हा फेक नरेटीव्ह पसरवला जात असल्याचा  आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या सभेला आलेले धर्मा माने म्हणाले. तालुक्यात सध्या बाहुबली सिनेमासारखं चाललंय. राम सातपुते हेच जनतेच्या मनातले आमदार आहेत. गोरगरीब जनेतेने रामभाऊंचा विकास बघून त्यांना मतदान केलं. मोहितेंच्या जीवावर जानकर निवडून आले आहेत. मारकडवाडीतलं आंदोलन  चुकीच्या मार्गाने चाललंय. जनतेच्या मनातला खरा आमदार तर राम सातपुते आहेत. जनतेनं रामभाऊलाच मतदान केलंय असं धर्मा माने म्हणाले आहेत. 


 

हे ही वाचा >>Mumbai Kurla BEST Bus Accident : अपघातग्रस्त BEST बस चालक 9 दिवसाआधीच नोकरीला लागला? तपासात धक्कादाय माहिती उघड

दरम्यान, धर्मा माने हे राम सातपुते यांचे समर्थक असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका व्हिडीओमुळे ते राज्यभरातील लोकांना माहिती झाले होते. या व्हिडीओमध्ये राम सातपुते हे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, जास्तीत जास्त मतदान भाजपलं झालं पाहिजे असा आग्रह करत होते. यावेळी त्यांनी धर्मा माने या आपल्या हक्काच्या कार्यकर्त्याला उद्देशून कामाला लागण्याचे आदेश दिले होते. तेव्हा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. राम सातपुते यांच्यावर मुजोरीच्या भाषेत बोलत असल्याचीही टीका विरोधकांकडून झाली होती. 


 

    follow whatsapp