BJP President : भाजप अध्यक्षपदासाठी मराठी माणसांचं नाव स्पर्धेत, नागपुरात होणार निर्णय?

मुंबई तक

• 01:05 PM • 11 Jun 2024

BJP President Latest Update : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. नागपूरमध्ये आरएसएस हा निर्णय घेणार असल्याची चर्चा दिल्ली सुरू आहे.

विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विनोद तावडे यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?

point

विनोद तावडे यांचे नाव शर्यतीत

point

नागपूरमध्ये आरएसएस निर्णय घेणार असल्याची माहिती

BJP New President News : जे.पी. नड्डा यांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपत असून, त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. भाजप अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत होती. त्या सगळ्यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे. त्यामुळे आता कुणाकडे पक्षाची सूत्रे दिला जाणार, याबद्दल उत्कंठा वाढली आहे. भाजपच्या अध्यक्ष पदासाठी तीन-चार नावे चर्चेत असून, यात विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. अशी चर्चा आहे की, आरएसएस भाजपचा नवा अध्यक्ष ठरवणार असून, नागपुरातून होणाऱ्या निर्णयात मराठी माणसाच्या हातात पक्षाची सूत्रे दिला जातात का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Discussions are going on in politics that Vinod Tawde will be the National President of BJP)

हे वाचलं का?

जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आला होता. तो ३० जून रोजी संपत आहे. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आहे. जे.पी. नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. 

स्पर्धेतील व्यक्ती मोदींच्या मंत्रिमंडळात

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जी नावे स्पर्धेत होती, त्या सगळ्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची जास्त चर्चा होती. त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. 

त्याचबरोबर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सी.आर. पाटील यांच्या नावांचीही चर्चा होती. या सगळ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. दिल्लीत अशी चर्चा आहे की, भाजपचा नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सोडण्यात आली आहे. 

कोणत्या नावांची चर्चा

सध्या भाजपच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना धक्का बसेल अशा व्यक्तीकडेही ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशीही शक्यता आहे. सध्या ओम माथूर, सुनील बन्सल आणि विनोद तावडे या तीन नावांचीच दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे तावडेंकडे ही जबाबदारी सोपवल्यास गडकरींनंतर पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी मराठी माणूस दिसेल.

चंद्रकांत पाटील विनोद तावडेंच्या नावाबद्दल काय म्हणाले?

"विनोद तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्याठिकाणी यश कसं मिळेल, यासाठी ते सगळ्या बारकाव्याने प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रात १९९५ मध्ये ते सरचिटणीस झाले. लगेच मुंबईचे अध्यक्ष झाले. आता अखिल भारतीय सचिव म्हणून गेले आणि राष्ट्रीय महासचिव झाले. आज सगळा पक्ष चालवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे केंद्र ठरवले त्यांना काय द्यायचं. खूप पर्याय त्यांच्या बाबतीत चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले, तरी मोठेच होतील. मला खूप आनंद होईल."

    follow whatsapp