CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, ‘बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण हे ‘घरगडी’

प्रशांत गोमाणे

13 Jan 2024 (अपडेटेड: 13 Jan 2024, 09:20 AM)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरु केले, तेव्हा त्यांची चेष्टा व्हायची, फोटोसेशन सुरु असल्याची टीका व्हायची.पण आता आपल्याला देशभरात स्वच्छ भारत अभियानाच महत्व समजतंय. त्यामुळे मोठा इम्पॅक्ट झालाय राज्य, शहरे स्वच्छ झाली.

eknath shinde criticize uddhav thackeray ram mandir temple and kalyan tour

eknath shinde criticize uddhav thackeray ram mandir temple and kalyan tour

follow google news

Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे-शिंदेंमधील वाद आणखीणच पेटला आहे. त्यात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कल्याण दौऱ्यावर असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण ठाकरे घरगडी समजतात, अशी टीका एकनाथ शिंदे  (eknath shinde) यांनी केली. (eknath shinde criticize uddhav thackeray ram mandir temple and kalyan tour)

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती. या दरम्यान माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरेंच्या कल्याण दौऱ्याचा प्रश्न विचारला होता. दौरा करायचा सर्वांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आमच्या स्वच्छता दौऱ्यामुळे पक्षाची अनेक वर्षातील घाण देखील साफ झाली आहे, असा चिमटा देखील शिंदेंनी यावेळी काढला.

हे ही वाचा : ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, ‘सेतू उद्धाटनात अटलजींचा फोटो नाहीच, राम मंदिरात तरी…’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरु केले, तेव्हा त्यांची चेष्टा व्हायची, फोटोसेशन सुरु असल्याची टीका व्हायची.पण आता आपल्याला देशभरात स्वच्छ भारत अभियानाच महत्व समजतंय. त्यामुळे मोठा इम्पॅक्ट झालाय राज्य, शहरे स्वच्छ झाली. तसाच प्रतिसाद या डीप क्लिन ड्राईव्हला मिळताना दिसत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेब आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना सवंगडी म्हणून वागवायचे. पण ठाकरे आपला पक्ष स्वता:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजतात. आणि ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही तर घरगडी समजतात. म्हणून त्यांची अशी अवस्था झाल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

हे ही वाचा : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राहुल नार्वेकरांनी कायदाच सांगितला

घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या काय त्यांनी सांगितली पाहिजे. त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढले. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतेच उद्धव ठाकरे मर्यादित राहिल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली. राममंदिराबाबत यांचे बेगडी प्रेम होते. हेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे. पण बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं जे स्वप्न होते ते मोदींनी पूर्ण केले आहे. मोदींनी मंदिरही बांधल, तारीखही सांगितली आणि आता उद्घाटनही होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    follow whatsapp