Pankja Munde : छत्रपती संभाजीनगरमधील वेरुळ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज शिव-शक्ती परिक्रमा (Shiv shakti parikrma) सुरू केली. आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, भक्ती आणि शक्तीच्या संगमाचा अलौकिक अनुभव घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी मत व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
नेत्यांवर प्रचंड तणाव
जालन्यातील अंतरवाली सराटीमधील लाटीहल्ल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खोचक अशी टीका केली आहे. पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पैकी तुम्हाला कोण अश्वासक वाटते. यावर त्यांनी बोलताना सांगितले की, या तिन्ही नेत्यांकडे पाहिल्यानंतर मला सध्या तरी काहीच वाटत नाही. कारण सध्या हे तीनही नेते प्रचंड तणावामध्ये दिसून येते आहे. कारण हे तीन नेते सत्तेत आल्यापासून त्यांना कोणत्या ना कोणत्या समस्या त्यांच्या मागे सुरु आहेत.
समस्यांचा डोंगरच डोंगर
पावसाळ्याच्या दिवसात पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे आता शेतीसाठी पाणी नाही अशा समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहेत. तर यामुळे हे तीनही नेते प्रचंड तणावाखाली असल्याचे मला दिसत आहेत असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
हे ही वाचा >> CM Eknath Shinde:’…तसा आदेश कसा दिला जाऊ शकतो’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
कामाचा झपाटा दांडगा
पंकजा मुंडे यांनी या तीनही नेत्यांना तणावात असल्याचे म्हटले असले तरी त्यांनी त्याचवेळी त्यांच्या कामाची त्यांनी शैलीही सांगितली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी काम केले आहे. त्याच्या कामाचा झपाटा दांडगा आहे.
नोकरीशाहीवर प्रचंड प्रभाव
तर अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नसला तरी त्यांची नोकरीशाहीवर प्रचंड प्रभाव आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा कामंही चांगले आहे तर त्याच वेळी त्यांचा कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी खूप जवळचे संबंध प्रस्थापित केले आहेत अशा शब्दातही त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
ADVERTISEMENT