Rajesh Shah : एकनाथ शिंदेंचा शिवसेना उपनेते राजेश शाहांना दणका

मुंबई तक

• 03:25 PM • 10 Jul 2024

Rajesh Shah News : पालघरचे शिवसेना उपनेते राजेश शाह यांचा मुलगा हिट अँड रन प्रकरणात अडकला आहे. पोलिसांनी राजेश शाहांनाही अटक केली होती. ते जामिनावर बाहेर आले. 

राजेश शाह यांच्यावर एकनाथ शिंदेंनी कारवाई केली आहे.

आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांची राजेश शाहांवर कारवाई

point

शिवसेना उपनेता पदावरून राजेश शाहांची हकालपट्टी

point

एकनाथ शिंदे राजेश शाहांबद्दल काय बोलले?

Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या राजेश शाह यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेता एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. पालघरचे शिवसेना उपनेता असलेल्या राजेश शाह यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Rajesh Shah was ousted from the post of Shiv Sena deputy leader by Eknath Shinde)

हे वाचलं का?

वरळीत ७ जुलै रोजी हिट अँड रनची घटना घडली. यातील मुख्य आरोपी मिहीर शाह हा राजेश शाह यांचा मुलगा आहे. मिहीर शाह फरार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शिवसेना उपनेते राजेश शाह आणि त्यांच्या चालकाला अटक केली होती. 

राजेश शाह यांची उपनेते पदावरून हकालपट्टी

हिट अँड रन प्रकरणात राजेश शाह अडकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची उपनेते पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >> मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले? 

शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह, पालघर यांना शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे मोरे यांनी सांगितले.

मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी.

 

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

या प्रकरणाबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की, "हिट अँड रन प्रकरणात राजकारण करण्याचा भागच नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहेत, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पक्षाने राजेश शाह यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यांना काढून टाकण्यात आले आहे."

हेही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण?

राजेश शाहांना जामीन

अपघातानंतर फरार झालेल्या मिहीर शाहाचा पोलीस शोध घेत होते. पोलिसांनी आधी राजेश शाह आणि त्याच्या चालकाला अटक केली होती. राजेश शाह यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.

हेही वाचा >> '...तर 288 उमेदवार पाडले म्हणून समजा', जरांगेंनी थोपटले दंड 

मिहीर शाहाला बेड्या

अपघाताच्या घटनेपासून फरार झालेल्या मिहीर शाहाला पोलिसांनी ९ जुलै रोजी अटक केली. मित्रासोबत शहापूरवरून विरारमध्ये आल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. 

    follow whatsapp