Shiv sena पक्षाची घटना बदलणार; CM शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ऋत्विक भालेकर

21 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 10:16 PM)

CM Eknath Shinde | Shivsena : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ‘शिवसेना पक्ष’ (Shiv sena) म्हणून निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह या गोष्टी आता शिंदे गटाला मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, […]

Mumbaitak
follow google news

CM Eknath Shinde | Shivsena :

हे वाचलं का?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ‘शिवसेना पक्ष’ (Shiv sena) म्हणून निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह या गोष्टी आता शिंदे गटाला मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पक्षाचा ताबा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. (Eknath Shinde take decision to amend the constitution of Shiv Sena party to bring in more democracy and equality in the organisational structure)

मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची घटना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थितीत राहणार आहेत. या समितीच्या बैठकीत तीन प्रमुख ठराव मांडले जाणार आहेत.

Sanjay Raut यांची सुपारी? कोण आहे कुख्यात गुंड राजा ठाकूर?

कोणते ठराव असणार?

१) शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक रचनेत अधिक लोकशाही आणि समानता आणण्यासाठी पक्षाच्या घटनेत सुधारणा करणे – शिवसेनेत संघटनात्मक समानता आणणे, त्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने या निकालात आयोगाने २०१८ मध्ये पक्षाने घटनेत केलेली दुरुस्ती नियमबाह्य केल्याचं म्हटलं आहे.

२) चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव – पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव भारताचे माजी अर्थमंत्री, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर’ चिंतामण द्वारकानाथ देशमुख’ यांच्या नावे बदलण्याचा प्रस्ताव

३) मराठी भाषेला अभिजात दर्जा (अभिजात दर्जा) द्यावा ही प्रदीर्घ प्रलंबित मागणीचा ठराव

शिंदेंनी घेतला होता आक्षेप :

निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असताना शिवसेनेच्या घटनेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बदलावर शिंदे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची घटना तयार केलेली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल करून पक्षप्रमुख हे पद निर्माण केले. हे पदच बेकायदा आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला होता.

शिवसेना नाव आणि चिन्ह आयोगाने हिरावलं, ठाकरेंकडे आता एकच शेवटचा पर्याय…

मूळ पक्षघटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होत असे. पण, निवडणुकीविना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. पक्षातील पदाधिकारी व नेत्यांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार उद्धव यांनी स्वत:कडे घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी झालेली नियुक्ती आणि इतर नियुक्त्याही बेकायदा ठरतात, असा मुद्दा मांडला होता. निवडणूक आयोगानेही शिंदे गटाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरला होता. त्यानंतर आता शिंदेंकडून शिवसेनेच्या घटनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

    follow whatsapp