Uddhav Thackeray : निवडणूक आयोगावरील 'ते' आरोप ठाकरेंना भोवणार?

मुंबई तक

• 03:13 PM • 23 Jun 2024

Uddhav Thackeray ECI : उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी मतदान सुरू असताना निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.

संजय राऊत यांच्यासोबत उद्धव ठाकरे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केली होती टीका

point

ठाकरेंनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू

point

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलारांकडून कारवाईची मागणी

Uddhav Thackeray News : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले होते. या प्रकरणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी तक्रार केली होती. या प्रकरणात ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. (uddhav Thackeray may face action of election commission of india)

हे वाचलं का?

मुंबईतील सहा मतदारसंघासह ठाणे, नाशिक मतदारसंघात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदानावेळी संथ गतीने मतदान होत असल्याचा मुद्दा बराच गाजला होता. त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. 

आशीष शेलारांकडून कारवाईची मागणी

उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी आयोगाकडे केली होती.

हेही वाचा >> 'नीट पेपर'फुटीचे लातूरपर्यंत कनेक्शन, दोन शिक्षकांना ATS ने घेतले ताब्यात 

आता पुढे काय होणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आरोपांची चौकशी करण्यास सांगितले होते. 

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >> आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले, एकाचा जागी मृत्यू 

ठाकरेंनी केलेल्या आरोपांची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार आहे. आरोपांमध्ये तथ्य आहे की, निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी हे केले याची शहानिशा केली जाणार आहे. ठाकरे यांनी राजकीय भूमिकेतून आयोगावर आरोप केल्याचे स्पष्ट झाल्यास नियमानुसार आयोगाकडून कारवाई केली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली.

    follow whatsapp