Madhukar Pichad Death News : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडताच भाजपच्या गोटातून एक दु:खद बातमी समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पिचड हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने नाशिकच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून राजकीय नेतेमंडळी सोशल मीडियावर पिचड यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
हे ही वाचा >> Nana Patole: "...तर आम्ही शपथविधीला नक्कीच गेलो असतो", नाना पटोले 'हे' काय बोलून गेले
लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीत मधुकर पिचड यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला गरज होती. परंतु, आजारपणामुळे ते सक्रीय नव्हते. कालच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि आज शुक्रवारी मधुकर पिचड यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानं भाजपच्या गोटात शोकाकळा पसरलीय.
हे ही वाचा >> ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधीच पाकिस्तानमध्ये खळबळ! ISI ने 'मुंबई 26/11' च्या मास्टरमाईंडला केलं अंडरग्राऊंड
1980 ते 2004 या कालावधीत नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून पिचड सलग सातवेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. मार्च 1995 ते जुलै 1999 या कालावधीत त्यांनी राज्याचं विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं. 2019 मध्ये पिचड यांनी मुलगा वैभवसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
ADVERTISEMENT
