हर्षवर्धन जाधव नव्या पक्षात; राजकीय निवृत्तीची घोषणा विसरुन पुन्हा सक्रिय

मुंबई तक

24 Mar 2023 (अपडेटेड: 24 Mar 2023, 03:36 AM)

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. जाधव यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.

Mumbaitak
follow google news

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. जाधव यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekar Rao) यांच्या 7पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपण लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhtrapati Sambhajinagar) चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, जाधव यांच्या रुपाने भारत राष्ट्र समितीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा नेता मिळाला असल्याची चर्चा आहे. (Former MLA Harshvardhan Jadhav from Kannada constituency of Chhatrapati Sambhajinagar district has joined BRS party)

हे वाचलं का?

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन जाधव हे मनसे आणि शिवसेनेचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते 2009 साली विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. पण त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता. पुढे शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथेही ते फार काळ रमले नाहीत. त्यांनी शिवसेनाही सोडली. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापन केली.

2019 मध्ये लोकसभेत पराभव :

2019 मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी लाखभर मतं घेतली मात्र मनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. परिणामी शिवसेनेचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि एम.आय.एम. पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यानंतर 2020 मध्ये जाधव यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती.

बीआरएस आता मराठवाड्यात विस्तारणार?

चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात एन्ट्री करत आक्रमकपणे पक्षविस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. मागील महिन्यात राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभाही पार पडली. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांच्यारुपाने मराठवाड्यात मोठा चेहरा मिळाला असल्याची चर्चा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीराजे हेही राव यांची साथ देणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप त्याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

    follow whatsapp