Congress-Shivsena: गेली 55 वर्षे काँग्रेस पक्षामध्ये असलेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसचा हात सोडून त्यांनी शिवधनुष्य हातात घेतले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत आपण काँग्रेस (Congress) सोडून शिवसेनेसोबत का जात आहोत त्यांनी भावनिक खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील काही गोष्टी सांगत एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या दूरदृष्टीकोनात घडणाऱ्या भारताच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मिलिंद देवारा यांनी राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार अस्तित्वात आले त्यावरूनही त्यांनी आपले स्पष्टीकरण देत आपण त्याला विरोध केले होते असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
विकासासाठी हातभार
मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडताना आपल्याला भावनिकदृष्ट्या जड जात असल्याचे सांगत हा निर्णय का घेतला तेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी जो जाहीर खुलासा दिला आहे. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारे आणि धडाडीचे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करत मुंबईच्या विकासामध्ये हातभार लावण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हे ही वाचा >> “राऊतांची तीन इंद्रियं निकामी, ऑपरेशन आम्हीच करू”, अजित पवार गटाचा पलटवार
राजकीय संस्कृती समृद्ध
लोकशाहीच्या समतावादी मुल्यांना पुष्टी देत एकनाथ शिंदे म्हणजे मेहनती, समाजात सहज मिसळणारे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाचे काम नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांच्यासारख्या माणसांमुळे राजकारणातील परिवर्तन हे भारताच्या राजकीय संस्कृतीला समृद्ध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसवर घातक परिणाम
मिलिंद देवरा यांनी यावेळी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी मी त्याला विरोध केला होता. कारण त्यावेळी काँग्रेसवर घातक परिणाम होण्याची शक्यता मला वाटत होती. यावेळी दोन्ही पक्षाच्या विचारधारेपेक्षा वैयक्तिक फायद्याला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT